वडिलांच्या चितेची आग विझण्यापूर्वी त्यानं केलं मतदान

वडिलांच्या चितेची आग विझण्यापूर्वी त्यानं केलं मतदान

वडिलांच्या चितेचा अग्नि विझण्यापूर्वी बिहारमधील एका व्यक्तिनं आपलं मतदानाचं कर्तव्य पार पाडलं.

  • Share this:

पाटणा, 29 एप्रिल : मतदानाचा दिवस अनेक जण सुट्टी म्हणून एन्जॉय करतात. काही जण लग्न मंडपातून मतदान केंद्र गाठत मतदान करताना आपण पाहिलं आहे. आज ( 29 एप्रिल ) देशात मतदानाचा चौथा टप्पा पार पडत आहे. पण, वडिलांचं निधन झालेलं असताना देखील स्मशानातून त्यांना मुखाग्नि देत लगेचच मतदानाचं कर्तव्य पार पाडल्याचं बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात समोर आलं आहे. दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना देखील मतदान करणाऱ्या व्यक्तिचं नाव राधेशाम सिंह असं आहे. राधेशाम सिंह यांचे वडिल रामचंद्र सिंह यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्यावर स्मशानात अंत्यसंस्कार सुरू असताना मुलगा राधेशाम सिंहनं मुखाग्नि दिल्यानंतर थेट मतदान केंद्र गाठलं. ज्यावेळी राधेशाम सिंह मतदान केंद्रावर पोहोचले त्यावेळी त्याच्या अंगावर स्मशातील अंत्यविधीकरता वापरलेले कपडे होते. हा सारा प्रकार पाहून मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांसह सर्वजण काही काळ स्तंब्ध झाले. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील महनौली उत्क्रमित मध्य विद्यालयामध्ये राधेशाम यांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं.

नवऱ्याचा खून करून व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करत होती माजी मुख्यमंत्र्याची सून

काय बोलला राधेशाम सिंह

5 वर्षानंतर मतदानाची संधी येत असते. यावेळी आपल्याला सरकार निवडण्याची संधी देखील मिळते म्हणून मी मतदान केल्याचं राधेशाम सिंह यांनी म्हटलं आहे.

तुम्ही मतदान केलं ना?

मतदानादिवशी असलेली सुट्टी अनेक जण बाहेर जात मौजमजा करण्याकरता प्राधान्य देतात. पण, अशा लोकांकरता राधेशाम सिंह हे आदर्श आहेत. वडिलांच्या चितेचा अग्नि विझण्यापूर्वी राधेशाम सिंह यांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं. मतदान करत राधेशाम सिंह यांनी लोकशाही बळकट करण्याकरता आपलं योगदान दिलं. त्यामुळे मतदानादिवशी असलेली सुट्टी मौजमजेत न घालवता प्रत्येकानं मतदान कराच!

VIDEO : मतदानासाठी उद्धव ठाकरेंही रांगेत, 15 मिनिटात झालं मतदान

First published: April 29, 2019, 5:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading