गौतम गंभीरने केली ही 'गंभीर' चूक; आरोप सिद्ध झाला तर उमेदवारी येईल धोक्यात

गौतम गंभीरने केली ही 'गंभीर' चूक;  आरोप सिद्ध झाला तर उमेदवारी येईल धोक्यात

आप उमेदवारानं गौतम गंभीरकडे दोन मतदान ओळखपत्र असल्याचा आरोप केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मार्च : लोकसभा निवडणुकीकरता गौतम गंभीर भाजपकडून पूर्व दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवत आहे. पण, त्याच्यावर आता आप उमेदवार आतिशी मार्लेना यांनी गंभीर आरोप केले आहेत. आतिशी यांनी केलेल्या आरोपानुसार गौतम गंभीरकडे दोन मतदान ओळखपत्र आहेत. यावरून आता आतिशी मार्लेना यांनी तीस हजारी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी आता पूर्व दिल्लीमध्ये रंगत वाढली आहे. गौतम गंभीरनं भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला भाजपनं पूर्व दिल्लीतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

काय आहे गौतम गंभीरवर आरोप

आप उमेदवार आतिशी यांच्यानुसार गौतम गंभीरकडे दोन मतदान ओळखपत्र आहेत. एक मतदान ओळखपत्र हे राजेंद्र नगरमधील आहे. तर, दुसरं मतदान ओळखपत्र हे करोल बागमधील आहे. याप्रमाणे दोन मतदान ओळखपत्र ठेवणं हा फौजदारी गुन्हा आहे. अशा प्रकारे जर एका व्यक्तिकडे दोन मतदार ओळखपत्र असल्यास निवडणूक आयोग सदर व्यक्तिला नोटीस पाठवू शकते. शिवाय, एका ठिकाणाहून सदर व्यक्तिला त्याचं नाव कमी करण्यास सांगितलं जातं. तसंच दिलेल्या कालावधीमध्ये सदर व्यक्तिनं नाव न हटवल्यास त्याच्याविरोधात पोलिस कारवाई करण्यात येते.

यापूर्वी देखील लागला होता आरोप

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गौतम गंभीरवर त्यानं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर देखील काही प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्यानंतर रिटर्निंग ऑफिसरनं गौतम गंभीरला उत्तर देण्यासाठी देखील बोलावलं होतं.

सध्या गौतम गंभीर जोरात प्रचार करत आहे. यावेळी त्यानं जिंकून येणार असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. दिल्लीतील काही रंगतदार लढतींपैकी पूर्व दिल्लीची लढत आहे.

VIDEO: राधाकृष्ण विखेंच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे?

First published: April 26, 2019, 4:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading