निवडणूक न लढताच या ठिकाणाहून झाला 37 जणांचा पराभव

निवडणूक न लढताच या ठिकाणाहून झाला 37 जणांचा  पराभव

उमेदवारी अर्जात चूक केल्यामुळं 37 जणांचं निवडणूक लढण्याचं स्वप्न भंगलं आहे.

  • Share this:

लखनऊ, 21 एप्रिल : उत्तर प्रदेशातील लखनऊ लोकसभा मतदरासंघातून 37 जणांचा पराभव झाला आहे. विश्वास नाही बसत? पण, लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी लखनऊ या मतदारसंघातून 37 जणांना पराभव स्वीकारावा लागला आहे. कारण, उमेदवारी अर्ज भरताना केलेली चूक त्यांना महागात पडली. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज छाननी अंती बाद करण्यात आला. त्यामुळे लखनऊमधून आता 14 उमेदवार निवडणूक लढवताना दिसणार आहेत. यामध्ये प्रमुख लढत ही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेसचे प्रमोद कृष्णम आणि सपाच्या पूनम शत्रुघ्न सिन्हा यांच्यामध्ये असणार आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक उमेदवारांनी अर्ज भरताना चुका केल्या होत्या. काहींनी चुकीची सही, चुकीची माहिती अशा चुका केल्या होत्या. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे दिसणाऱ्यांचं देखील नाव आहे. सपाच्या उमेदवार पूनम सिन्हा यांच्या उमेदवारी अर्जामध्ये कोणतीही चूक नव्हती. दरम्यान लखनऊमधून 37 जणांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानं निवडणुकीपूर्वी त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं अशी चर्चा रंगली आहे.

ट्रम्प यांनी केली मोठी चूक, म्हणाले श्रीलंकेत 13.8 कोटी ठार झाले!

उत्तर प्रदेशमध्ये भजपला 2014 प्रमाणे यश मिळणार?

2014मध्ये भाजपनं उत्तर प्रदेशमध्ये 72 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यंदा भाजपला 2014प्रमाणे यश मिळणार का? हे पाहावं लागणार आहे. शिवाय, सपा आणि बसपानं आघाडी केल्यानं त्याचा फायदा, फटका कुणाला बसणार हे देखील पाहावं लागणार आहे. लखनऊसह पाटणा, रायबरेली, अमेठी जिकंण्यासाठी देखील भाजपनं आता अधिक लक्ष दिलं आहे. त्यामुळे लढत अधिक रंगतदार होणार आहे.अमेठीमध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना आव्हान दिलं आहे. पण, अमेठीची जनता कुणाला साथ देणार हे पाहावं लागणार आहे.

VIDEO : चोर मचाये शोर, पोत्यात घातली चक्क बूट आणि चपला!

First published: April 21, 2019, 11:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading