News18 Lokmat

मनमोहन ते मोदी : दोन निवडणुकांमध्ये तुमच्या आयुष्यात किती फरक पडला

2014 आणि 2019 या दोन निवडणुकांच्या कालावधीत सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात काय फरक पडला आहे ते जाणून घेऊयात...

News18 Lokmat | Updated On: Mar 11, 2019 09:28 PM IST

मनमोहन ते मोदी : दोन निवडणुकांमध्ये तुमच्या आयुष्यात किती फरक पडला

नवी दिल्ली, 11 मार्च: लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने 7 टप्प्यातील मतदानाचा कार्यक्रम जाहीर केला. 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीच्या प्रचारात मोदी सरकारने गेल्या 5 वर्षात किती व कसे काम केले याचा आढावा व विश्लेषण केलेच जाईलच. 2014 आणि 2019 या दोन निवडणुकांच्या कालावधीत सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात काय फरक पडला आहे ते जाणून घेऊयात...

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साक्षरता, दरडोई उत्पन्न आणि पायाभूत सुविधा यात सुधारणा झाली. प्रत्येक सरकारने देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. पाच वर्षात सरकारने केलेल्या कामाचे खऱ्या अर्थाने मुल्यमापन निवडणुकीच्या काळात केले जाते. गेल्या पाच वर्षात व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. युपीए सत्तेत असतानाच्या तुलनेत व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर येते. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे 2014नंतर महागाई कमी होत आहे. पण रोजगाराकडे आकडेवारीकडे लक्ष टाकले तर मात्र गंभीर परिस्थिती असल्याचे लक्षात येते.

पेट्रोलचे दर- 2014च्या तुलनेत सध्या पेट्रोलचे दर 20 टक्क्यांनी अधिक आहेत. 2014मध्ये पेट्रोलचे दर 71.56 रुपये इतके होते. ते सध्या 72.24 रुपये प्रति लिटर आहेत.

निर्यात वाढली- 2014मध्ये भारताची निर्यात 264 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. ती सध्या 270 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

शेअर बाजारात तेजी- 2014मध्ये सेन्सेक्स 24 हजारावर होता तो आता 35 हजारावर पोहोचल आहे.

Loading...

भाज्यांचे दर- गेल्या पाच वर्षात बटाट्यांच्या किमती 25 वरून 15 रुपये झाल्या आहेत.  टोमॅटो दर 15 रुपयांवरून 34 तर कांद्यांच्या किमती 23 वरुन 20 रुपयावर पोहोचल्या आहेत. अर्थात गेल्या 5 वर्षात भाज्यांच्या दरात चढ-उतार पहायला मिळाले आहेत.

शौचालयांची संख्या- देशात शौचालय असलेल्या घरांची संख्या 38 टक्क्यांवरुन 98 टक्क्यांवर पोहोचली आहे.

मोबाईल डेटा- 2014मध्ये 1 जीबी डेटासाठी सरासरी 33 रुपये मोजावे लागत होते. आता 10.9 रुपये द्यावे लागतात. तर 2014मध्ये 33 MB वापर केला जात होता. आता 8.3 GB डेटा वापरला जातो.

हवाई प्रवास- देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या 2014मध्ये 6.7 कोटी इतकी होती ती आता 13.9 कोटी इतकी झाली आहे.


VIDEO : सेनेत दाखल झाल्यानंतर शरद सोनवणे राज ठाकरेंबद्दल म्हणतात...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2019 09:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...