महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता

महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता

महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्या आहे. भाजप-शिवसेनेत युतीची आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडीची चर्चा सुरू आहे. शिवसेनेनं आधीच स्वबळाचा नारा दिला आहे. तर भाजपकडून युतीसाठी मनधरणी सुरू आहे. अशातच निवडणूक आयोगाने एकत्र निवडणूक घेण्याच्या तयारीत आहे. जर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र, झाल्या तर राज्याचे राजकारण ढवळून निघेल. दोन्ही निवडणूक एकत्र झाल्या तर शिवसेनेला याचा फायदा होईल, भाजपला नमतं घेऊन सेनेला जास्त जागा द्याव्या लागतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

एकत्र निवडणुकींची पंतप्रधान मोदींची आयडिया

दोन वर्षांपूर्वी 2016मध्ये 'नेटवर्क 18' ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेण्याची आयडिया बोलून दाखवली होती. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या निवडणुकांमधून देशाला बाहेर काढा, अशी विनंती अनेक राजकीय पक्षांनी माझ्याकडे बोलून दाखवली होती. त्यामुळे एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घ्यावी असा विचार आला. 10 दिवसांत निवडणूक झाल्यातर पुढील पाच वर्ष कारभार सुरळीत चालेल. पण, हे एका पक्षाचे काम नाही. याला सर्व पक्षांचा पाठिंबा असायला हवाय. निवडणूक आयोगाच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष एकत्र आले तर हे शक्य होऊ शकतं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. मोदींच्या या आयडियाला तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही पाठिंबा दर्शवला होता. आचारसंहितेमध्ये आता बदल झाला पाहिजे. एकत्र निवडणूक पद्धतीचा सर्व पक्षांनी विचार करायला हवा, असं मतही त्यांनी व्यक्त केलं होतं.

(सविस्तर बातमी लवकरच)

==================================

First published: January 14, 2019, 7:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading