त्या BSF जवानाचे थेट मोदींना आव्हान, वाराणसीतून लढणार लोकसभा

त्या BSF जवानाचे थेट मोदींना आव्हान, वाराणसीतून लढणार लोकसभा

...म्हणून पंतप्रधान मोदींच्या विरोधात बीएसएफ जवान वाराणसीतून निवडणूक लढणार आहे.

  • Share this:

चंदीगढ, 30 मार्च : भारतीय लष्कराला मिळणाऱ्या जेवणावरून प्रश्न उपस्थित करणारा व्हिडीओ व्हायरल केलेल्या BSF चा निलंबित जवान तेज बहाद्दूर यादव यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तेज बहाद्दूर लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढणार आहेत.

तेज बहाद्दूर यादव लष्करात मिळणाऱ्या जेवणाचा व्हिडीओ व्हायरल करून त्यावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर चर्चेत आले होते. त्यानंतर लष्कराच्या शिस्तीचे आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले होते.

ऑनलाइन व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी तेज बहाद्दूर यादव यांच्यावर लष्कराने कारवाई केली होती. हरियाणात माध्यमांशी बोलताना तेज बहाद्दूर यादव यांनी सांगितले की, मी वाराणसीत पंतप्रधान मोदींविरोधात अपक्ष निवडणूक लढणार आहे. भ्रष्टाचार संपवायचा आहे आणि त्यासाठी निवडणूक लढवायची आहे. मी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला पण मला निलंबित करण्यात आलं. भ्रष्टाचार संपवणे आणि सुरक्षा दल मजबूत करणे हे माझं लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितले.

तेज बहाद्दूर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात जवानांना चांगलं जेवण मिळत नसल्याचं आणि अनेकदा उपाशी झोपावं लागत असल्याचा दावा करण्यात आला होती. हे प्रकरण गृह मंत्रालयाकडे पोहचल्यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी BSF कडून अहवाल मागवला होता.

VIDEO: 'आपला पंतप्रधान कोण?' उद्धव ठाकरे म्हणाले...

First published: March 31, 2019, 9:12 AM IST

ताज्या बातम्या