Lok sabha election 2019 चौकीदार फक्त श्रीमंतांचे असतात, प्रियंका गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Lok sabha election 2019 चौकीदार फक्त श्रीमंतांचे असतात, प्रियंका गांधींचा मोदींवर हल्लाबोल

140 किलोमीटरच्या या यात्रेत प्रियंका विद्यार्थ्यांशी 'सांची बात' करत संवाद साधणार आहे.

  • Share this:

प्रयागराज 18 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज इथून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरूवात केलीय. काँग्रेसने प्रियंका गांधी यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी प्रियकां गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. चौकीदार हे फक्त श्रीमंतांचे असतात अशी टीका त्यांनी केली. मोदी हे गरिबांचे नाव घेत असले तरी ते फक्त श्रीमंतांना संरक्षण देतात असंही त्या म्हणाल्या.

प्रयागराज इथल्या बडा हनुमान मंदिर इथं प्रियंका गांधी यांनी विधीवत पुजा केली आणि प्रचाराला सुरूवात केली. प्रियांका या प्रयागराज इथून  पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणशी इथे बोटीने जाणार आहेत. या तीन दिवसांच्या प्रवासात त्या गंगा काठच्या गावांना भेटी देतील. या यात्रेला गंगा यात्रा असं नाव देण्यात आलं आहे.

काँग्रेसने प्रियंका यांच्या बडा हनुमान मंदिरातल्या पुजेचा फोटो ट्विट केलाय. प्रियंका गांधी यांच्या फोटोसोबत इंदिरा गांधींचा फोटोही लावण्यात आलाय. इंदिरा गांधी यांनी 1976मध्ये या मंदिरात पुजा केली होती. परम्पराएं, रीति-रिवाज़ कभी नहीं बदलते असं त्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

140 किलोमीटरच्या या यात्रेत प्रियंका विद्यार्थ्यांशी 'सांची बात' करत संवाद साधणार आहे. मोदींच्या मन की बात च्या धर्तीवर 'सांची बात' हा उपक्रम आखण्यात आलाय. प्रियंका यांच्या या जलयात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ठिकठिकाणी माँ गंगा ने बुलाया है असे पोस्टर्स लावले आहेत. या प्रवासात प्रियंका या विविध मंदिरांनाही भेटी देणार आहेत.

VIDEO: प्रियांका गांधी जेव्हा लोकांना विचारतात, तुम्ही मला कसं ओळखलंत?

First published: March 18, 2019, 3:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading