नवी दिल्ली 24 मार्च : देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातल्या रुग्णांचा आकडा आज 519वर पोहोचला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशवासियांना संबोधित केलं. या आधी गुरूवारी त्यांनी भाषण केलं होतं. त्यात त्यांनी देशवासियांना रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभर जनतेने कडकडीत बंद पाळला होता. तर 5 वाजता आपल्या गॅलरीत येत सगळ्यांनी थाळीनाद करत डॉक्टर्स आणि कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या सगळ्यांचे आभारही मानले होते. रात्री 12 पासून सर्व देशात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पुढचे 21 दिवस कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही अशी घोषणाही त्यांनी केली.
सर्व देशात लॉकडाउन हा जनता कर्फ्यूपेक्षाही कडक असेल. या काळात कुणालाही घराबाहेर निघता येणार नाही असंही पंतप्रधानांनी सांगितलं. जनता कर्फ्यू हा पंतप्रधानांनी लोकांना फक्त आवाहन केलं होतं. त्याला कायद्याचं बंधन नव्हतं. आता मात्र हा कर्फ्यू सर्व कायद्याने देशात लागू करण्यात आला आहे.
काय म्हणाले पंतप्रधान?
आज रात्री 12 वाजल्यापासून पुढच्या 21 दिवसांपर्यंत देशभर संपूर्ण लॉकडाउन. हा लॉकडाउन म्हणजे जनता कर्फ्यूपेक्षा कडक उपाययोजना आहे. हे 21 दिवस तुम्ही सांभाळलं नाहीत, तर आपण 21 वर्षं मागे जाऊ. हे पंतप्रधान म्हणून नाही, तर तुमच्या परिवारातला सदस्य म्हणून सांगतो आहे.
केंद्र सरकार राज्य सरकारांबरोबर गरिबांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सगळे प्रयत्न आपण करत आहोत. पण आयुष्य वाचवण्यासाठी जे आवश्यक आहे, त्याला सर्वोच्च प्राधान्य द्यायलाच हवी. आरोग्य सेवा वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
केंद्र सरकारने 15000 कोटी कोरोनाव्हायरसच्या संकटासाठी दिले आहेत. मेडिकल आणि पॅरामेडिकल ट्रेनिंगचं काम करावं लागेल.
हे वाचा - 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर, वाचा काय आहे 'कर्फ्यू आणि लॉकडाऊन'मधील फरक?
'जान है तो जहाँ है!' हात जोडून पंतप्रधान मोदींनी केली कळकळीची विनंती
कोरोनाव्हायर फैलावाचं चक्र मोडायलाच हवं. घरातली लक्ष्मणरेषा ओलांडून नका. जान है तो जहाँ है
काही लोकांना वाटतंय, की सोशल डिस्टन्सिंग फक्त आजारी व्यक्तींसाठी आहे. पण हा गैरसमज आहे.
काही लोकांच्या बेपर्वाई, काही लोकांचे गैरसमज यामुळे तुम्हाला, तुमच्या मुलांना, तुमच्या आई-वडिलांना, तुमच्या मित्रांना खूप मोठ्या संकटात टाकणार आहे.
हे वाचा - VIDEO मला कोरोना नाहीये, माझ्या आईला त्रास देऊ नका; विमान कर्मचारी ढसाढसा रडली
अशी बेपर्वा वृत्ती सुरू राहिली, तर भारताला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. ही किंमत केवढी मोठी असेल याचा अंदाजसुद्धा लावणं कठीण आहे.
सगळ्या देशांतले तज्ज्ञ हेच सांगत आहेत की या व्हायरसचा फैलाव कमी करण्यासाठी एकमेव प्रभावी मार्ग आहे. सोशल डिस्टन्सिंग.
याशिवाय कोरोनापासून वाचायचा कुठलाही मार्ग नाही. कोरोनाव्हायरसला रोखायचं असेल तर संक्रमणाच्या सायकलला तोडावंच लागेल.
जगातल्या समर्थ देशांनाही या महासाथीने किती कमजोर बनवलं आहे, हे तुम्ही पाहताय. त्यांच्याकडे संसाधनं आहेत. ते प्रयत्नही करत आहेत. पण कोरोनाव्हायरस इतक्या वेगाने पसरतो आहे, की आव्हान मोठं होत जातंय.