बापरे! सिमेंट मिक्स करणाऱ्या अजस्त्र टाकीत बसले 18 मजूर, VIDEO पाहून बसेल धक्का

बापरे! सिमेंट मिक्स करणाऱ्या अजस्त्र टाकीत बसले 18 मजूर, VIDEO पाहून बसेल धक्का

'भूकेने मरण्यापेक्षा आम्हाला असं मरण आलं असतं तरी चाललं असतं. दुसरा काय मार्ग आहे आम्हाला.'

  • Share this:

इंदूर 02 मे : लॉकडाऊनमुळे देशभर मजूर अडकले आहेत. जीव धोक्यात घालून हजारो मजूर पायी प्रवास करत आहेत. तर काही जण जुगाड करून जीव धोक्यात घालत आहेत. सिमेंट मिक्स करण्याऱ्या एका अजस्त्र टाकीत बसून प्रवास करणाऱ्या 18 मजुरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे मजूर महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशकडे निघाले होते अशी माहिती इंदूरचे पोलीस अधिक्षक उमाकांत चौधरी यांनी दिली. तो ट्रक पोलिसांनी जप्त केला असून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

इंदूरच्या चेक पोस्टवर पोलिसांनी हा मिक्सर जेव्हा थांबवला तेव्हा ड्रायव्हरच्या बोलण्यातून पोलिसांना संशय आला. देशभर काही प्रकरणं उघडकीस आल्याने पोलीस जास्त खबरदारी घेत आहेत. पोलिसांनी जेव्हा मिक्सरचं छोटं झाकण उघडलं तेव्हा त्यांना धक्काच बसला.

त्यांनी त्या सगळ्यांना बाहेर येण्याचा आदेश दिला त्यानंतर एक एक करत तब्बल 18 जण त्या टाकीतून बाहेर आले तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला. असा प्रवास करणं म्हणजे जीव धोक्यात घालणं आहे. टाकीला चिटलेलं सिमेंट, त्याचा तीव्र वास आणि टाकीत हवा येण्यास मार्गच नसल्याने धोका होते असं पोलिसांनी सांगितलं.

VIDEO अडकलेल्या परप्रांतिय मजुरांचा उद्रेक, पोलिसांवर केली तुफान दगडफेक

तर भूकेने मरण्यापेक्षा आम्हाला असं करण्याशिवाय दुसरा काय मार्ग होता अशी प्रतिक्रिया या मजुरांनी व्यक्त केलीय. त्यांची व्यथा पाहून पोलिसांनाही अस्वस्थ झालंय. पण कारवाई केल्याशीवाय पर्याय नाही असंही त्यांचं म्हणणं आहे.

सिमेंट मिक्स करणाऱ्या टाकीत बसून 18 मजून महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात जात होते. मध्यप्रदेशातल्या इंदूर इथं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. तेव्हा पोलिसांनाच धक्का बसला. मिक्सर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

First published: May 2, 2020, 6:49 PM IST

ताज्या बातम्या