लॉकडाऊनचं 'बिग बॉस' जिंकायचंय, केंद्रिय आरोग्य खात्याचा निर्धार

लॉकडाऊनचं 'बिग बॉस' जिंकायचंय, केंद्रिय आरोग्य खात्याचा निर्धार

लॉकडाऊन हे बिग बॉससारखं आहे. मात्र आपल्याला मानसिक स्वास्थ न बिघडू देता सुखरुप बाहेर पडायचं आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मार्च : कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने 21 दिवसांच्या लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली आहे. या 21 दिवसांच्या काळात घरात क्वारंटाइनमध्ये असलेल्या नागरिकांसाठी आरोग्य मंत्रालय एका नव्या लाईफस्टाईलचे नियोजन करत आहे. कोरोनाशाची लढताना Behavioral Social Intervention या नावाने ही योजना तयार केली जात आहे.

मानसिक आरोग्यासाठी काम करणारी राष्ट्रीय संस्था या उपक्रमांची निर्मिती करीत आहेत. यामुळे घरात असलेल्या भारतीयांचे मानसिक स्वास्थ चांगलं राहण्यास मदत होणार आहे.

लहान मुले, तरुण आणि वृद्धांना या लॉकडाऊनच्या काळात अॅक्टिव ठेवण्यासाठी नव्या आणि आरोग्यदायी कल्पनांचा विचार या उपक्रमात करण्यात येणार आहे. क्वारंटाइनच्या काळात घरात एकटे असल्याने याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर होण्याची शक्यता आहे, यामुळे अनेकांना डिप्रेशनसारख्या आजारांचा सामना करण्याची शक्यता आहे. सरकार या उपक्रमांद्वारे काही जणांपर्यंत फोनवरुन पोहचण्याच्या प्रयत्न करणार आहे. या व्यक्ती त्यांचे शेजारी आणि परिसरातील व्यक्तींना याबाबत अधिकाधिक जागरुक करतीलच, त्याचबरोबर मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत. आरोग्य मंत्रालय लवकरच मानसिक आजारावर मात करण्यासाठीच्या धोरणांची घोषणा करणार आहे.

संबंधित- CORONA संकटात आनंद महिंद्रांचा स्तुत्य उपक्रम, अवघ्या 7500 रुपयांत व्हेंटिलेटर

लॉकडाऊन हे बिग बॉससारखे आहे, त्यात मानसिक आजारपण घेवून बाहेर न पडता मानसिक आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे लॉकडाऊनकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं, असे मत एम्सच्या मानसशास्त्रीय विभागाचे प्राध्यापक डॉ. नंदकुमार यांनी व्यक्त केले आहे. घरात राहून दिवसभर कंटाळून जाता, दिवसभराची छोटी ध्येये ठरवून ती गाठण्याचा प्रयत्न करणे, नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा ठेवणे, निरनिराळे खेळ खेळून स्वत:ला आनंदी ठेवणे, तसेच स्वयंशिस्तीच्या सहाय्याने या काळावर मात करत आंनदी राहायला हवे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात मिळालेला हा निवांतपणाचा काळ घरच्यांसाठी, आपल्या जुन्या मित्रांशी संवाद साधत घालवाव. घरातील मंडळींशी तुटलेला संवाद या निमित्ताने पुन्हा दृढ करता येता येणार आहे. तसेच जुन्या मित्रांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा भेटणे या काळात शक्य होणार आहे. तुमच्या आवडीचे छंद मग ते स्वयंपाक करणे असो, वा बगिच्यात काम करणे असो, व्यायाम, ध्यान, योगा करणे असो. या माध्यमातून स्वत:ला अधिकाधिक आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनीही या काळाचा उपयोग चांगले वाचन, व्यायाम आणि आवडतील असे सिनेमे तसेच ज्ञान वाढविण्यासाठी करण्याची गरज आहे. वयोवृद्धांनी या काळात अधिकाधिक धार्मिक, अध्यात्मिक बाबींकडे लक्ष द्यावे, असेही तज्ज्ञ सांगत आहेत. घरातील तरुणांशी गप्पागोओष्टी करत आपले अनुभव त्यांच्यापर्यंत पोहचवण्याची ही वयोवृद्धांना चांगली संधी आहे.

संबंधित - अमिर खानच्या लेकीचं गुपित झालं उघड म्हणाली, 'या' अभिनेत्रीला करायचंय डेट

First published: March 27, 2020, 9:48 AM IST

ताज्या बातम्या