FACT CHECK : हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स 15 ऑक्टोंबरपर्यंत बंद राहणार ? सरकारने केला खुलासा

FACT CHECK : हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स 15 ऑक्टोंबरपर्यंत बंद राहणार ? सरकारने केला खुलासा

'सोशल मीडियावर पर्यटन मंत्रालयाचा हवाला देत जी माहिती देण्यात येत आहे ती माहिती खोटी आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 09 एप्रिल : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉडाऊन सुरू आहे. हा 21 दिवसांचा लॉकडाऊन 14 एप्रिलला संपणार आहे. हा लॉकडाऊन पुढे वाढवायचा की त्यात काही सूट द्यायची याबाबत सरकारी पातळीवर विचार करण्यात येत आहे. मात्र सोशल मीडियावर सध्या अफवांचं पेव फुटलं आहे. अनेक खोट्या बातम्या येत आहेत. त्या फॉर्वडही केल्या जात आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सबाबत अशीच एक बातमी सध्या व्हायरल होत आहे. 15 ऑक्टोंबरपर्यंत हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद राहणार असं त्यात म्हटलं आहे. त्यावर आता सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं  आहे.

सरकारी संस्था प्रसार भारतीने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. अशा प्रकारचा कुठलाही निर्णय झालेला नाही. सोशल मीडियावर पर्यटन मंत्रालयाचा हवाला देत जी माहिती देण्यात येत आहे ती माहिती खोटी आहे. असा कुठलाही निर्णय नाही किंवा सरकारकडे प्रस्तावही आला नाही असा खुलासा त्यात करण्यात आला आहे.

देशात कोरोनाचा विळखा वाढतो आहे. आता टेस्टिंग वेगाने होत असल्याने रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 549 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 17 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 5734 तर मृत्यूचा आकडा 166 वर गेला आहे. 473 जणांना हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिलीय.

हे वाचा - कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी असा आहे नरेंद्र मोदींचा ‘मास्टर प्लॅन’

अग्रवाल यांनी माहिती देतांना स्पष्ट केलं की PPE सूट, मास्क आणि व्हेंटिलेटर्सचा देशांतर्गत पुरवढा सुरू झाला आहे. देशात 20 उत्पादक PPE सूटची निर्मिती करत आहेत. 1 कोटी 7 लाख PPE सूटची मागणी नोंदविण्यात आली आहे. तर 49 हजार व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देण्यात आली आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

हे वाचा -  कोरोना रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह समजून दिला डिस्चार्ज, पोलिसांचा शोध सुरू

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ होत असून आता कोरोना रुग्णांची संख्या 1297 एवढी झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे राजधानी मुंबईत अवघ्या 12 तासांत 143 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

(संपादन - अजय कौटिकवार)

First published: April 9, 2020, 6:37 PM IST

ताज्या बातम्या