बापरे! नागरिकांच्या बेफिकीरीमुळे या देशात पुढील सहा महिने चालणार लॉकडाऊन

बापरे! नागरिकांच्या बेफिकीरीमुळे या देशात पुढील सहा महिने चालणार लॉकडाऊन

या देशातील पंतप्रधानांनी नागरिकांनी सावध केलं होतं. जिम, रेस्टाॅरंट आदी ठिकाणी न जाण्याचं आवाहनही केलं होतं, परंतु

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मार्च : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narednra Modi) 21 दिवसांचं लॉकडाऊन जाहीर केलं आहे. कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लोकांना घरातचं राहण्याचं आवाहन केलं जात आहे. आतापर्यंत जगातील अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केलं. त्यातच दोन ते तीन महिन्यांनंतर चीनमध्ये आताकुठे परिस्थिती हळूहळू सुरळीत होत आहे.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियातही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लॉकडाऊन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे लॉकडाऊन पुढील सहा महिने चालणार असं ऑस्ट्रेलियाच्या सरकारनं सांगितलं आहे.

आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना विषाणूमुळे 3166 लोकांना संसर्ग  झाला आहे. तर डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ऑस्ट्रेलियाने कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सोमवारपासून लॉकडाऊन जाहीर केलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित - जीवाची बाजी लावून कोरोनाविरोधात लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा

ऑस्ट्रेलियातील सर्व पब, क्लब आणि जिम यासह चर्च देखील बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगवर अधिक लक्ष दिले पाहिजे अशी सरकारची इच्छा आहे.

ऑस्ट्रेलियन सरकारने लोकांना बर्‍याचदा सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता, परंतु ऑस्ट्रेलियन सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करीत नसल्याचे समोर आले होते.  समुद्रकिनारे, रेस्टॉरंट्स, बार, पब इत्यादी ठिकाणी जाणे. मग सरकारने हे पाऊल उचलले आहे.

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी संसदेत सांगितले होते की, कामानंतर कोणीही पबमध्ये जाणार नाहीत किंवा सकाळीही कोणी  जिममध्ये जाणार नाही. कॅफेमध्ये बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. सध्या कोरोना हे देशासमोरील मोठे आव्हान आहे.

पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले की, हा आपल्यासाठी फार कठीण काळ आहे. याबरोबरच त्यांनी देशवासियांना पुढील सहा महिने लॉकडाऊनसाठी तयार राहावे असा इशारा दिला आहे.

सध्या कोरोना संसर्गामुळे ऑस्ट्रेलियात कोरोना विषाणूची 3000 हून अधिक रुग्ण आहेत. सर्वाधिक रुग्ण व्हिक्टोरिया आणि न्यू साउथ वेल्समधील आहेत. याशिवाय 13 जणांचा मृत्यूही झाला आहे. असे असूनही ऑस्ट्रेलियन क्वारंटाईनचा सल्ला स्वीकारत नव्हते.

संबंधित - कोरोनाच्या उद्रेकात कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक, कंपनीकडून 25 टक्के जादा पगार

First published: March 27, 2020, 7:55 PM IST

ताज्या बातम्या