मराठी बातम्या /बातम्या /देश /

Lockdown मध्ये घराबाहेर पडलेल्या दोन तरुणांना पोलिसांची अमानुष मारहाण, VIDEO VIRAL

Lockdown मध्ये घराबाहेर पडलेल्या दोन तरुणांना पोलिसांची अमानुष मारहाण, VIDEO VIRAL

पोलिस नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करत आहेत. पोलिसांच्या मारहाणीचा हा VIDEO त्यात viral होत आहे.

पोलिस नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करत आहेत. पोलिसांच्या मारहाणीचा हा VIDEO त्यात viral होत आहे.

पोलिस नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करत आहेत. पोलिसांच्या मारहाणीचा हा VIDEO त्यात viral होत आहे.

सोनीपत, 7 मे: देशभर पसरलेल्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन (Lockdown) तसंच कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं,कंपन्या,कार्यालय बंद ठेवण्यात आली असून, संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी सहकार्य करावं,नियम पाळावेत असं आवाहन करण्यात येत आहे. ठिकठीकाणी नियमांचे पालन होते आहे की नाही हे बघण्यासाठी पोलीस (Police) यंत्रणा कार्यरत आहे.

ईतरीही अनेक ठिकाणी नागरिक नियम मोडून गर्दी करताना दिसत आहेत. यामुळे पोलिस आणि नागरिक यांच्यात संघर्ष निर्माण होत असल्याच्या घटना घडत आहेत.

अशीच एक घटना हरियाणातील (Haryana) सोनीपत (Sonipat) जिल्ह्यात घडल्याचं उघडकीस आलं असून पोलिसांनी दोन युवकांनाजोरदार मारहाण केल्याचा (Police beats Two Youths) व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरलझालाआहे. या घटनेमुळेपोलिसांचा अमानुष चेहरा समोर आलाअसून, त्याबद्दल जोरदार प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दुसरीकडे शहर पोलिस ठाण्यात या दोन तरुणांविरुद्ध लॉकडाउनचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली .

वरात आली...सप्तपदीही झाल्या; पण नवरीला न घेता परतला नवरदेव; असं का झालं?

याबाबत सविस्तर हकीगत अशी आहे की,सोनीपत शहरातील मिशन चौकात पोलिस नेहमीप्रमाणे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करतहोते. त्याच वेळी स्कूटीवरून दोन तरुण तिथून जात होते. त्यांना पोलिसांनी अडवलं; त्यावरून वादावादी सुरू झाली आणि पोलिसांनी या तरुणांना मारहाण सुरू केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलझाला. दरम्यान, ‘नाकाबंदीकरूनतपासणी केली जातहोती. त्यावेळी हे दोन तरुण न थांबता पळून जात होते त्यामुळं त्यांना ताब्यात घेण्यात आलं. शंकर आणि रूपेंद्र अशी या युवकांची नावं आहेत, अशी माहिती शहर पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी दिली.

" isDesktop="true" id="548095" >

त्यांना मारहाण झाल्याचा कोणताही व्हिडिओ आपल्यापर्यंत आला नसल्याचं त्यांनी सांगितलं. या तरुणांची स्कूटी अडवली असता ते पळून जात होते, त्यात स्कूटी घसरल्यानं ते जखमी झाल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे.

या प्रकरणाची दखल शहराचे उपपोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार यांनी घेतली असून,याव्हिडिओची तपासणी केली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. या दोन तरुणांनी पोलीसांनी अडवल्यावर न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न केला असून, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Video, Video viral