मराठी बातम्या /बातम्या /देश /

लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या चहाच्या दुकानात झालेल्या वादातून एकाची गोळी घालून हत्या

लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या चहाच्या दुकानात झालेल्या वादातून एकाची गोळी घालून हत्या

लॉकडाऊनमध्ये सर्व दुकाने बंद असताना हे दुकान सुरू कसं? याबाबतही चौकशी सुरू आहे

लॉकडाऊनमध्ये सर्व दुकाने बंद असताना हे दुकान सुरू कसं? याबाबतही चौकशी सुरू आहे

लॉकडाऊनमध्ये सर्व दुकाने बंद असताना हे दुकान सुरू कसं? याबाबतही चौकशी सुरू आहे

  • Published by:  Meenal Gangurde

प्रयागराज, 5 एप्रिल : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे लॉकडाऊनदरम्यान चहाच्या दुकानात सुरू असलेल्या चर्चा दरम्यान झालेल्या वादातून एक व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना करेली ठाणे क्षेत्रातील बक्शी मोढा येथे घडली. येथे लॉकडाऊन असतानाही एका चहाचे दुकान सुरू होते.

येथे उपस्थिती दोघांमध्ये कोरोना व्हायरससंदर्भात वाद झाला. मात्र कालांतराने हा वाद इतका वाढला की एका व्यक्तीची गोळी घालून हत्या करण्यात आली. यामध्ये लोटन निषाद नावाच्या एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या बाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले आणि तपास सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

एसएसपी सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांनी न्यूज18 शी बातचीत करताना सांगितले की दोघांमध्ये कोरोना संदर्भात चर्चा सुरू होती. तेव्हा दोघांमध्ये मारहाण झाली. यानंतर लोटनचा मोठा भाऊ वाचविण्यासाठी मध्ये आला. त्यावेळी भाऊ गेल्याचे पाहून लोटनही तेथे गेला. तेव्हा गोळीचा आवाज आला ही गोळी लोटनला लागली, आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. सध्या आरोपींना पकडून तपास केला जात आहे. याशिवाय लॉकडाऊन असतानाही चहाचं दुकान सुरू असल्याचे याचाही तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणात 8 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

संबंधित - एकावेळेला 25-30 पोळ्यांचा सुरु आहे खुराक, तबलिगी सदस्यांमुळे कर्मचारी त्रस्त

संबंधित - 'तबलिगी' बनले भुकेल्यांसाठी देवदूत, गरजूंना केलं अन्न धान्याचे वाटप

First published:

Tags: Corona virus in india, Crime