बेळगाव, 20 मे : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात 31 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहेत. या लॉकडाऊनमध्ये प्रत्येक राज्याने नियमांमध्ये शिथिलता त्यांच्या निर्णयानुसार दिली आहे. कर्नाटकने त्यांच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमधून येणाऱ्यांना बंदी घातली आहे. यामुळे गुजरातहून आणलेल्या मृतदेहावर राज्याच्या सीमेवर महाराष्ट्रात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेल्लद बागेवाडी इथल्या तरुणाचा गुजरातमध्ये अचानक तब्येत बिघडल्यानं मृत्यू झाला होता. तो गुजरामध्ये नोकरी करत होता. दोन दिवसांपूर्वी त्याची तब्येत बिघडली होती. तेव्हा रुग्णालयात त्याला दाखल केलं होतं मात्र उपचारावेळीच त्याचा मृत्यू झाला.
गुजरातमधून तरुणाचा मृतदेह गावी आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गुजरात, महाराष्ट्र आणि कोगनोळी इथून कर्नाटकात त्याच्या गावी मृतदेह नेण्यात येत होता. मात्र कोगनोळी इथं कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर त्यांना अडवण्यात आले.
हे वाचा : बापरे! मुंबईतल्या KEMमधल्या शवगृहात मृतदेहांसाठीही वेटिंग लिस्ट
कर्नाटकमध्ये प्रवेश दिला जात नसल्यानं शेवटी तरुणावर कोगनोळी इथंच अंत्यसंस्कार कऱण्याच निर्णय घेतला. इथल्या गायरानात अधिकारी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. तरुणाच्या वडिलांनी त्याच्या मृतदेहाला मुखाग्नी दिला. यावेळी चिक्कोडीचे पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
हे वाचा : मुंबईहून परतलेल्या तरुणींचा बिअरसाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये गोंधळ मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.