Home /News /national /

दुर्दैव! मुलगी पास झाल्याचं प्राचार्यांनी सांगताच बाप म्हणाला, 'तिचा मृत्यू झाला'

दुर्दैव! मुलगी पास झाल्याचं प्राचार्यांनी सांगताच बाप म्हणाला, 'तिचा मृत्यू झाला'

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

लॉकडाऊनमुळे हातातलं काम थांबलं आणि एकवेळचं अन्न मिळणंही बंद झालं. त्यातच एका मुलीचा आजारी पडल्यानं मृत्यू झाला तोपर्यंत दुसरी मुलगी आजारी पडली.

    आग्रा, 07 मे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून देशात 24 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या लोकांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशात एका बाप आर्थिक संकटात सापडला असून यातच मुलीला गमवावं लागल्याचा प्रकार घडला आहे. घरात खाण्यासाठी धान्य नाही, त्यातच आजारी पडलेल्या मुलीवर उपचारासाठी पैसे नव्हते. तिचा मृत्यू 28 एप्रिलला झाला आणि त्यानंतर दुसऱ्या मुलीची तब्येतही बिघडली. मुलीच्या उपचारासाठी मदत करण्याची विनवणी आग्र्यातील राम सिंग करत आहे. गेल्या दीड महिन्यापासून घरातच असून आठवड्यापूर्वी 11 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. मुलगी आजारी होती आणि तिच्यासाठी औषधच काय पण खायला घालण्यासाठीही काही शिल्लक नव्हते. त्यानंतर आता दुसऱ्या मुलीची तब्येत बिघडली असून तिच्यावर उपचारासाठी पैसे नाहीत. राम सिंग म्हणाला की, तो फिटरचं काम करतो पण आता लॉकडाऊनमध्ये काहीच काम नाही. यामुळे घरचा खर्च भागवणं कठीण आहे. घरी चूलही बंद आहे. गॅस सिलेंडरसुद्धा संपलं आहे.  काही दिवस आधी पर्यंत पोलिस पोलीस ठाण्यासमोर क्वारंटाइन सेंटरमध्ये येणाऱ्या जेवणाच्या पाकिटातील उरलेली पाकिटे पोलीस द्यायचे. त्यामुळे कसेबसे पोट भरायचे. आता सेंटर बंद झाल्यानं तेही मिळत नाही. पाहा VIDEO : एका मिनिटासाठी संपूर्ण शहर 'धुळी'स मिळालं, पाहा निसर्गाचं रौद्र रुप मृत्यू झालेली मुलगी जवळच्याच शाळेत शिकत होती. प्राचार्यांचा बुधवारी फोन आला तेव्हा सांगितलं की, मुलगी पास झाली आहे आणि तिचं पुढचं शिक्षण ऑनलाइन असेल. तेव्हा राम सिंगने प्राचार्यांना सांगितलं की, मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर प्राचार्यांनीच काही सामाजिक संस्थांना राम सिंगला मदतीची गरज असल्याचं सांगितलं. एका संस्थेनं त्यांना धान्य आणि काही पैसे दिले आहेत. दरम्यान, एडीएम सिटी प्रभाकांत अवस्थी यांनी म्हटलं की, या प्रकरणाची चौकशी करून त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल. हे वाचा : कोरोना चाचणी आता घरच्या घरी करणं शक्य होणार; मेड इन इंडिया टेस्ट किट तयार
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या