Breaking: सगळ्यात मोठी बातमी, आणखी दोन आठवड्यांनी वाढला Lockdown

Breaking: सगळ्यात मोठी बातमी, आणखी दोन आठवड्यांनी वाढला Lockdown

  • Share this:

नवी दिल्ली 01 मे : लॉकडाऊन संपायला आता फक्त 2 दिवस राहिले आहेत. सुरुवातीला 21 दिवसांचा आणि नंतर वाढ करून पुन्हा 19 दिवसांचा लॉकडाऊन देशात लावण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची घोषणा केली होती. तो लॉकडाऊन आता 3 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर काय उपाययोजना कराव्यात यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढणार असल्याचं जाहीर केलं आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने सध्याच्या कायद्यात दुरुस्ती करून हा लॉकडाऊन वाढवला आहे. आता देशात 17 मेपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने Disaster Management Act 2005 नुसार हा लॉकडाऊन वाढवला आहे. आता देशात 17 मेपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. त्याच बरोबर रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनसाठीही केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

First published: May 1, 2020, 6:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading