लॉकडाऊनमध्ये भारतीय सेनेला मोठं यश, चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा

लॉकडाऊनमध्ये भारतीय सेनेला मोठं यश, चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरामध्ये सुरक्षित राहावं आणि त्याच सोबत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचं काम भारतीय सुरक्षा दलाकडून सुरू आहे.

  • Share this:

कुलगाम, 04 एप्रिल : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरसह देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर पडण्यासाठी निर्बंध आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी वारंवार प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी सैन्यदल आणि पोलिसांची नजर नागरिकांवर आहे. तर दुसरीकडे याचा फायदा घेऊन वारंवार दहशतवाद्यांकडून कुरघोडी सुरू आहेत. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा आजचा डावही भारतीय सैन्यानं उधळून लावला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरामध्ये सुरक्षित राहावं आणि त्याच सोबत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचं काम भारतीय सुरक्षा दलाकडून सुरू आहे. जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील मनगोरी परिसरात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवात्यांमध्ये चमकच झाली. यामध्ये दोन ते तीन दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा दलानं घेरल्याची माहिती मिळत आहे. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला मोठं यश आलं आहे.

हे वाचा-लॉकडाउन 6 आठवडे केलं तरच कोरोनावर नियंत्रण शक्य, संशोधकांनी दिला 'हा' सल्ला

शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये सुदंरबनी परिसरात लाईन ऑफ कंट्रोलचं उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला होता. भारतीय सैन्याकडून या हल्ल्याला चौख प्रत्युत्तर देण्यात आलं. शुक्रवारी राजौरी इथे झालेल्या चकमकीत 6 जावन जखमी झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून फेकण्यात आलेला गोळा सैन्याच्या पोस्टजवळ पडल्याने अनेक जवान गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमी जवानांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये 4 जवान आणि 2 बीएसएफचे जवान जखमी झाले आहेत.जगभरात कोरोनाच्या संकटात असतानाही पाकिस्तानने पुन्हा एलओसीचं उल्लंघन केलं.

पाकिस्तानने गुरुवारी भारतावर जम्मू-काश्मीरच्या जनसांख्यिकीय रचनेत अवैधपणे बदल केल्याचा आरोप केला. त्याचवेळी नव्या अधिवास नियमांना 'आंतरराष्ट्रीय कायद्याचे थेट उल्लंघन' असं म्हटलं गेलं. भारत सरकारने बुधवारी नवीन अधिवास नियम जारी केले, त्याअंतर्गत 15 वर्षांपासून तिथे राहणाऱ्या नागरिकांना निवासी दर्जा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हे वाचा-कोरोनाच्या भीतीमुळे दाम्पत्याची आत्महत्या, पोस्‍टमार्टम करण्यास डॉक्टरचा नकार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2020 07:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading