Lockdown: त्याने पाठवलं चॉकलेट, ती म्हणाली Love You, प्रेयसीला खुष करण्यासाठी रोमँटिक जुगाड

Lockdown: त्याने पाठवलं चॉकलेट, ती म्हणाली Love You, प्रेयसीला खुष करण्यासाठी रोमँटिक जुगाड

दररोज भेटणं, प्रेमाच्या आणभाका घेणं असं सगळं रोमँटिक आयुष्य सुरू होतं. लॉकडाऊनमुळे त्या दोघांची ताटतूट झाली.

  • Share this:

नवी दिल्ली 13 एप्रिल : लॉकडाऊनमुळे सध्या सगळा देश घरात बंद आहे. 21 दिवसांचा लॉकडाऊन 14 एप्रिलला संपणार असून त्यानंतर आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर महाराष्ट्रासह काही राज्यांनी हा लॉकडाऊन आधीच वाढविण्याची घोषणा केली आहे. घराबाहेरच पडता येत नसल्याने तरुणांची फारच कुचंबना होत आहे. तर अनेकांनी त्यावर उपायही शोधले आहेत. पाँडेचेरीमध्ये एका युवकाने प्रयसीचा विरह सहन न झाल्याने एक अनोखी युक्ती करत तिला चॉकलेट पाठवलं.

त्या दोघांचं गेल्या काही वर्षांपासून प्रेम होतं. दररोज भेटणं, प्रेमाच्या आणभाका घेणं असं सगळं रोमँटिक आयुष्य सुरू होतं. लॉकडाऊनमुळे त्या दोघांची ताटतूट झाली. फक्त फोनवरच बोलणं सुरू होतं. भेटता येत नसल्याने तरुणाने अनोखी युक्ती केली.

त्याने ड्रोन घेतलं आणि त्याला एक मोठ्ठी तिला आवडणारी कॅडबरी बांधली. आणि ड्रोनच्या साह्याने त्या तरुणीच्या टेरेसवर तो ड्रोन घेऊन गेला. टेरेसवर येण्यासाठी त्याने तिला आधीच सांगितलं होतं. टेरेसवर आल्याचा मॅसेज मिळताच त्याने बरोबर तिच्या घरावर ड्रोन नेलं आणि तिने ते चॉकलेट काढलं आणि त्याला Love You ची चिठ्ठी पाठवली.

Work from home मुळे वाढतेय ढेरी, पोटाची चरबी कमी करण्यासाठी टिप्स

या दोघांची ही Love Story सध्या सोशल मीडियावर चांगलीच हिट ठरली आहे. लॉकडाऊनचं पालन करत या पठ्ठ्याने आपल्या प्रेयसीला खुष करण्यासाठी हा रोमँटिक जुगाड केला त्यामुळे नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.

हेही वाचा- 

प्रत्येकवेळी प्रामाणिकपणा गरजेचा नाही, Lockdown मध्ये अशी जपा नाती

Lockdown मध्ये गुगलवर काय सर्च करत आहेत भारतीय, वाचून बसेल धक्का

First published: April 13, 2020, 10:15 PM IST

ताज्या बातम्या