मराठी बातम्या /बातम्या /देश /

लॉकडाऊनमध्ये लुडोवरून झालं भांडण, 8 वर्षाच्या मुलानं बहिणीवरूद्ध पोलिसात केली तक्रार

लॉकडाऊनमध्ये लुडोवरून झालं भांडण, 8 वर्षाच्या मुलानं बहिणीवरूद्ध पोलिसात केली तक्रार

प्रातिनिधिक.

प्रातिनिधिक.

8 वर्षाच्या मुलानं लॉकडाऊनमध्ये पोलिसात अजब तक्रार केली आहे. या मुलानं चक्क पोलिसांना आपल्या बहिणाला अटक करण्यास सांगितले आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
नवी दिल्ली, 14 मे : कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत घोषित करण्यात आला असला तरी, त्यापुढेही कालावधी वाढवण्याचे संकेत याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. त्यामुळे जवळजवळ 2 महिने सर्वच लोकं घरात कैद आहेत. यातच एका 8 वर्षाच्या मुलानं लॉकडाऊनमध्ये पोलिसात अजब तक्रार केली आहे. या मुलानं चक्क पोलिसांना आपल्या बहिणाला अटक करण्यास सांगितले आहे. हे प्रकरणाची तक्रार कसबा पोलीस स्थानकात आली. या 8 वर्षाच्या मुलानं आपल्या मोठ्या बहिणीसह पाच मुलींना 'अटक' करण्यास पोलिसांना सांगितले. ओमर निदार असे या मुलाचे नाव असून, त्यानं मी मुलगा असल्याने या मुली माझी थट्टा करतात. मला लुडो, शटल (बॅडमिंटन), पोलीस आणि चोर खेळू देत नाही, अशी तक्रार केली. जेव्हा या ओमरनं आपल्या वडिलांकडे ही तक्रार केली, तेव्हा त्याच्या वडिलांनी मस्करीत त्याला पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले. मात्र ओमरनं ही मस्करी मनावर घेत थेट पोलिसांशी संपर्क साधला. कसबा पोलीस स्टेशनचे अधिकारी यु.पी. उमेश आणि केटी नीरज यांनी मुलाच्या घरी भेट दिली आणि मुलींना अटक केल्याच्या तक्रारीचा 'मुद्दा' सोडवला. 10 मे रोजी पोलिस एका प्रकरणात शेजारच्या ठिकाणी आले तेव्हा तिसरीत शिकत असलेल्या ओमरनं इंग्रजीत लिहिलेली तक्रार दोन पोलिसांना दिली. ओमरनं दोन्ही पोलिसांकडे जाऊन, 'मला एक तक्रार आहे. सायंकाळी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मुलाला असे आश्वासन दिले की दुसऱ्या दिवशी घरी जाऊन त्याच्या समस्येवर तोडगा काढतील. सोमवारी पोलीस या मुलाच्या घरीही पोहचले. त्यावेळी मुलानं आपल्या बहिणीची आणि काही मुलींची तक्रार केली. त्याची तक्रार ऐकल्यानंतर पोलिसांनी इतर मुलांना बोलावून खेळताना या मुलास सामील करण्याचा सल्ला दिला. या मुलाच्या बहिणीने सांगितले की तिचा भाऊ पोलिसात तक्रार करेल असे तिला कधीही वाटत नव्हते.
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या