कानपूर, 10 मे: भारतात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांची पोटासाठी भ्रांत सुरू आहे. अनेकांना एकवेळच्या जेवणावर आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. अशा स्थितीत बेघर आणि भीक मागून जगणाऱ्या लोकांची परिस्थिती तर याहूनही बिकट आहे. लॉकडाऊनच्या काळात बेघर लोकांची काय अवस्था आहे, याचं चित्र स्पष्ट करणारा एक मन सुन्न करणारा व्हिडिओ (Emotional video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
संबंधित व्हिडिओ हा उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील सुतरखाने येथील आहे. याठिकाणी एक बेघर तरुण भुकेनं व्याकुळ झाल्यामुळे रस्त्यावर सांडलेलं दूध पिताना (drinking milk spilled on street) दिसत आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व दुकानं किंवा घरं बंद असल्यामुळे अशा बेघर लोकांना कित्येक दिवस उपाशीपोटी जागावं लागत आहे. अशा अवस्थेत पोटाची भूक भागवण्यासाठी ते मिळेल ते अन्न खाण्याच्या प्रयत्न करत आहेत.
सुतरखाने येथील लोकांच्या मते, रविवारी सकाळ एका दुधवाल्याची सायकल रस्त्यावर कलंडली. त्यामुळे त्याचं सर्व दूध रस्त्यावर सांडलं. दूध रस्त्यावर सांडल्यानंतर दूधवाला तेथून निघून गेला. पण त्याचवेळी भुकेनं व्याकुळ झालेल्या तरुणा त्या ठिकाणाहून जात होता. यावेळी त्यानं रस्त्यावर सांडलेलं दूध पाहिलं आणि गुडग्यावर टेकून हे रस्त्यावर सांडलेलं दूध पिऊ लागला. ही घटना स्थानिक लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित बेघर तरुणासाठी अन्नाची व्यवस्था केली.
पेट की भूख बड़ी ही खराबजहां हमारा भारत देश करोना जैसी गंभीर महामारी से जूझ रहा वहीं कुछ लोग हमारे भारत देश में भुखमरी के कगार पर भी गुजर रहे ज हां ऐसा ही मामला कानपुर के सुतरखाना दूध मंडी में देखने को मिला जहां किसी दूध वाले का दूध गिर गया वही पेट का भूखा व्यक्ति दूध को पीने लगा pic.twitter.com/eu8M9SeDDr
— Manish Gupta (@GupttaManish) May 9, 2021
हे ही वाचा-भय इथले संपत नाही! कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती?
खरंतर, उत्तर प्रदेशातील लॉकडाऊनचा कालावधी आणखी काही दिवसांसाठी वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे त्याठिकाणी हातावर पोट भरणाऱ्या लोकांना एकवेळच्या अन्नाचा प्रश्न सतावत आहे. दरम्यानच्या काळात हजारो कामगार बेरोजगार झाले आहे. त्यामुळे हाताला काम नाही, खिशात पैसा नाही आणि पोटात अन्न नाही अशी दुर्दैवी अवस्था लोकांची झाली आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊन लागू केलेल्या जिल्हा प्रशासनाकडून अशा असहाय्य लोकांना रेशनही दिलं जात नाहीये. त्यामुळे अनेकांना उपाशी पोटी राहावं लागत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kanpur, Lockdown, Uttar pradesh, Viral video.