Home /News /national /

अंघोळ करताना सापानं घातलं पायाला वेटोळं, घरात निघाली नागिणीसह 34 पिल्लं

अंघोळ करताना सापानं घातलं पायाला वेटोळं, घरात निघाली नागिणीसह 34 पिल्लं

दरभंगा जिल्ह्यातील लालबाग मोहल्ला येथे असलेल्या घरातून मोठ्या संख्येने साप बाहेर आले आहेत. त्यांना पकडण्यात यश आलं आहे.

    दरभंगा, 22 मे : सापाला पाहून नुसती आपली जिथे भंबेरी उडते तिथे साप आपल्या अंगावर आला तर काय होईल या विचारानंच थरकाप उडतो. असच एका तरुणाचं झालं आहे. अंघोळ करत असताना अचानक त्याच्या पायाला सापानं वेटोळ घातलं. त्यामुळे तरुण चांगलाच घाबरला होता. तो घरात आला तेव्हा त्याला दिसलं की घरभर सापाची पिल्लं फिरत होती. हा धक्कादायक प्रकार बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात घडला आहे. हा प्रकार पाहून तो एवढा घाबरला की त्याला काय करावं हे सूचेना. मिळालेल्या माहितीनुसार, विनय झा नावाचा तरुण आपल्या घरातील बाथरूममध्ये आंघोळ करत होता, त्यावेळी त्याच्या पायाला एका सापानं वेटोळं घातलं. जेव्हा तो बाथरूममधून बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले की सापाची पिल्लं घरभर फिरत आहेत. त्यानंतर त्यानं आपल्या शेजाऱ्यांना याची माहिती दिली त्यांनी सर्पमित्रांशी संपर्क साधला. हे वाचा-क्वारंटाइन सेंटरमधला धक्कादायक प्रकार, महिलांना साड्यांऐवजी दिली लुंगी 34 सापाच्या पिल्लांसह एका नागिणीला पकडलं आज तकनं दिलेल्या वृत्तानुसार सर्पमित्रानं संपूर्ण घर तपासल्यानंतर तब्बल 34 सापाची पिल्लं निघाली. त्यासोबत एका मोठी नागीण पकडण्यात यश आलं आहे. ही नागीण अनेक दिवसांपासून या घरात राहात होती अशी चर्चा आहे. याचं कारण म्हणजे ही नागिणीची पिल्लं टाइल्सच्या आता लपून बसलेली मिळाली. त्यामुळे या नागिणीचं अनेक दिवसांपासून वास्तव्य असावं असं सांगितलं जात आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्येही 2018 रोजी अशीच एक घटना समोर आली होती. एका घराच्या आतून सुमारे 300-400 साप बाहेर आले. यामुळे खळबळ उडाली होती. हे वाचा-भर चौकीत आरोपीनं धारधार चाकूने कापला पोलिसाचा कान, कारण वाचून व्हाल हैराण हे वाचा-VIDEO : कार थांबवून सुरू होतं फोटोशूट, अचानक सिंहीणीनं उघडला दरवाजा आणि... संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Lockdown

    पुढील बातम्या