Lockdown ड्रायव्हिंग सायसन्सची मुदत संपली? गाडीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे? नितीन गडकरींनी घेतला हा मोठा निर्णय

सगळ्या राज्य सरकारांवर हा निर्णय बंधनकारक असणार आहे. त्यामुळे लाखो लोकांना दिलासा मिळाला आहे.

  • Share this:

मुंबई 1 एप्रिल :  कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलाय. त्यामुळे सगळेच व्यवहार ठप्प आहेत. फक्त जिवनावश्यक गरजा सोडल्या तर सर्वच बंद ठेवण्याचा आदेश सरकारने दिला आहे. त्यामुळे सगळ्यांचीच कामं रेंगाळली आहेत. कुणाला गाड्यांचं नव्याने रजिस्ट्रेशन करायचं आहे, ड्रायव्हिंग लायन्सची मुदत संपलीय अशा सगळ्यांनाच चिंता पडलीय. अनेकांची शेवटची तारीख ही 31 मार्च अशी होती. त्यामुळे आपलं काय होणार अशा चिंतेने सगळ्यांना ग्रासलंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

ज्या लोकांच्या अशा गोष्टींची मुदत 31 मार्च पर्यंतच आहे त्या सगळ्यांना आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सगळ्या राज्य सरकारांवर हा निर्णय बंधनकारक असणार आहे. त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाब केंद्रीय संसाधन मंत्री डॉ. रमेश पोखरिया निशंक यांनी बोर्डाला निर्देश दिले होते.

हे वाचा - VIDEO... आणि आमदाराने धरले पोलिसांचे पाय, कोरोनाचा असाही इफेक्ट

याशिवाय नववी आणि अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा विचार सुरू आहे. काही ठिकाणी नववी आणि अकरावी परीक्षा झाल्या आहेत. जेथे परीक्षा झाल्या नाहीत त्यांबाबत लवकरच विचार करण्यात येईल. याशिवाय दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सीबीएसई बोर्डाने हे पाऊल उचलावे याबाबतचे निर्देश केंद्रीय मानव संसाधन मंत्री (HRD) डॉ. रमेश पोखरिया निशंक यांनी दिले होते.

हे वाचा - फिल्ममेकरने केली Lockdown दरम्यानच्या नेतृत्वाची तारिफ; विरोधकांना सडेतोड उत्तर

सध्या देशभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आलं आहे. येत्या 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहे. लहान मुलांना याचा फटका बसू नये यासाठी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे सध्या बंद करण्यात आली आहे. मात्र याचा विद्यार्थ्यांना फटका बसू नये यासाठी अनेक राज्यांमध्ये शिक्षण विभागाकडून पुढाकार घेण्यात येत आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2020 08:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading