मराठी बातम्या /बातम्या /देश /

काश्मिरींच्या प्रेमामुळे मराठी पर्यटक भारावले; संकटाच्या काळात कसल्याही स्वार्थाविना दिला मदतीचा हात!

काश्मिरींच्या प्रेमामुळे मराठी पर्यटक भारावले; संकटाच्या काळात कसल्याही स्वार्थाविना दिला मदतीचा हात!

राजकीय घटनाक्रम आणि अशांततेमुळे सामान्य माणसाचा काश्मीरकडे पाहण्याची नजर जरा गढुळली आहे. मात्र ही नजर बदलणारं सुखद वास्तव नुकतंच समोर आलं आहे.

राजकीय घटनाक्रम आणि अशांततेमुळे सामान्य माणसाचा काश्मीरकडे पाहण्याची नजर जरा गढुळली आहे. मात्र ही नजर बदलणारं सुखद वास्तव नुकतंच समोर आलं आहे.

राजकीय घटनाक्रम आणि अशांततेमुळे सामान्य माणसाचा काश्मीरकडे पाहण्याची नजर जरा गढुळली आहे. मात्र ही नजर बदलणारं सुखद वास्तव नुकतंच समोर आलं आहे.

  • Published by:  News18 Desk

अनंतनाग, 10 जानेवारी : काश्मीरमध्ये (Kashmir) नुकत्याच झालेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळं (heavy snow fall) तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातून जनसामान्य चिंतेत आहेत. मात्र  काळातही काश्मीरचे सामान्य नागरिक (common citizens of Kashmir) त्यांचं मानवी कर्तव्य (human responsibilities) अजिबात विसरले नाहीत. नुकतीच घडलेली एक सुखद घटना या गोष्टीला ठळक करते.

मट्टन अनंतनाग (Mattan Shrinagar) इथल्या लोकप्रिय रिसॉर्टमध्ये (resort) महाराष्ट्रातील 11 पर्यटक (11 tourists from Maharashtra) थांबले होते. बर्फवृष्टीत अडकून पडलेले असताना या 11 जणांना काश्मिरी स्थानिक रहिवाशांनी (locals of Kashmir) अगदी मोफत राहण्याची सुविधा देऊ केली. सोबत प्रेमानं खाऊ-पिऊही घातलं.

पर्यटकांचा हा जथ्था काश्मीरमध्ये फिरण्याचा आनंद घेण्यासाठी गेला होता. नंदिता परदेशी नावाच्या ट्रॅव्हल एजंटमार्फत (travel agent) या पर्यटकांनी बुकिंग केलं होतं. मात्र अचानकच निसर्गानं रौद्र रूप धारण केल्यामुळं त्यांना परत फिरणं अशक्य झालं. या सगळ्या संकटाचा अंदाज आला तसा काश्मीरचे स्थानिक रहिवासी असलेले इकबाल आणि अब्बास हे दोन भाऊ उत्स्फूर्तपणे पुढं आले. त्यांनी या पर्यटकांची मोफत राहण्या-खाण्याची व्यवस्था केली. या दोन भावांनी मदतीचा हात पुढं केल्यावर तोवर अस्वस्थ असलेल्या महिला पर्यटकांनी (female tourists) तर सुटकेचा निश्वासच सोडला.

हे ही वाचा-कौतुकास्पद निर्णय! विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी परिवहन विभागाने बदलली बसची वेळ..

स्थानिक हॉटेल मालकांचं म्हणणं आहे, की या काळात त्यांचं हॉटेल बंदच होतं. मात्र  आपल्या अडचणी बाजूला ठेवत त्यांनी या पर्यटकांची मदत केली. यातून काश्मिरींनी शतकानुशतके जोपासलेली माणुसकी अबाधित राहिली. मुख्य जम्मू-श्रीनगर नॅशनल हायवे सुरू होत नाही आणि वातावरणाचा धोका ओसरत नाही तोवर या महिला पर्यटक इथंच राहू शकतील असंही हॉटेलमालक म्हणाले.

दुसऱ्या बाजूला स्थानिक प्रशासन आणि पर्यटन विभागही काश्मीरमधल्या गरजू पर्यटकांना मदतीचा हात देत आहे. या महिला पर्यटकांची बातमी कानावर पडताच पर्यटक विभागाच्या पोलिसांनीही लगोलग त्यांच्याशी संपर्क केला. दरम्यान, काश्मीरमधील पर्यटन (tourism) यंदा विविध कारणांमुळं वेगानं खालावलं आहे. मात्र नकारात्मक प्रसिद्धी हे त्याचं महत्त्वाचं कारण मानलं जात आहे. मात्र आज अनोळखी पर्यटकांसाठी निस्वार्थ मदतीचा हात पुढं करत काश्मिरींनी त्यांचा काळजातला मायेचा ओलावा आणि संवेदनशीलता पुन्हा एकदा उजागर केली आहे. आता त्यांचा हाच निखळ प्रेमभाव बाहेरच्या जगाला समजण्याची गरज आहे, ज्यातून जगाची काश्मिरींकडे पाहण्याची दृष्टी बदलेल.

First published:

Tags: Jammu and kashmir