Home /News /national /

UP Elections: भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात अटक वॉरंट

UP Elections: भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात अटक वॉरंट

भाजपला रामराम ठोकलेले उत्तर प्रदेशातील ओबीसी नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं आहे.

    लखनऊ, 12 जानेवारी: भाजपला (BJP) सोडचिठ्ठी दिलेले (Quit) आमदार (MLA) आणि उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) माजी कॅबिनेट मंत्री (Ex Cabinet Minister) स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Mourya) यांच्याविरोधात अटक वॉरंट (Arrest warrant issued) जारी करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमधील स्थानिक न्यायालयानं एका जुन्या प्रकरणात हे अटक वॉरंट जारी केलं आहे. ठरलेल्या दिवशी न्यायालयात हजर न झाल्यामुळे न्यायालयानं हे अटक वॉरंट जारी केलं असून त्यामुळे मौर्य हे चांगलेच अडचणीत आले आहेत.  काय आहे प्रकरण? हे प्रकरण आहे 2014 सालचं. हिंदू देवदेवतांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. यापूर्वी  2016 सालीदेखील मौर्य यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठानं या वॉरंटला स्थगिती देत मौर्य यांना दिलासा दिला होता. हा खटला जेव्हा मौर्य यांच्यावर दाखल झाला, तेव्हा ते बहुजन समाजवादी पक्षात होते. त्यानंतर ते भाजपमध्ये दाखल झाले होते.  पुढील सुनावणी 24 तारखेला स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात येत असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 जानेवारीला होणार असल्याची माहिती आहे. बुधवारी मौर्य यांनी न्यायालयासमोर हजर व्हावं, असं आदेश देण्यात आले होते. मात्र या आदेशाचं पालन न केल्यामुळे मौर्य यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.  हे वाचा - राजकीय वातावरण गरम स्वामी प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेशातील महत्त्वाचे ओबीसी नेते आहेत. भाजपला सोडचिठ्‌ठी देत त्यांनी सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. अखिलेश यांनी मौर्य यांच्यासोबतच्या भेटीचा फोटोदेखील सोशल मीडियावरून शेअर केला होता. मात्र अद्याप मौर्य यांनी अधिकृतरित्या समाजवादी पक्षात प्रवेश केलेला नाही. भाजपला मौर्य यांनी सोडचिठ्ठी देणं आणि त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजावलं जाणं या घटना निव्वळ योगायोग आहेत की त्यामागे काही राजकीय अर्थ आहेत, याची जोरदार चर्चा सध्या उत्तर प्रदेशात रंगली आहे. 
    Published by:desk news
    First published:

    Tags: Politics, Uttar pardesh, Yogi Aadityanath

    पुढील बातम्या