Home /News /national /

धक्कादायक! 'या' कारणामुळे भडकलेल्या तरुणाने थेट बँकेलाच लावली आग, झाली तुरुंगात रवानगी

धक्कादायक! 'या' कारणामुळे भडकलेल्या तरुणाने थेट बँकेलाच लावली आग, झाली तुरुंगात रवानगी

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime News: छोट्या-छोट्या गोष्टींवर काढलेला राग किती मोठ्या नुकसानाची कारण बनू शकतो, याचा प्रत्यय नुकताच आला आहे. बँकेत गेलेल्या तरुणाने रागाच्या भरात केलेल्या कृत्याने त्याची रवानगी तुरुंगात झाली आहे.

    हावेरी, 11 जानेवारी: छोट्या-छोट्या गोष्टींवर काढलेला राग किती मोठ्या नुकसानाची कारण बनू शकतो, याचा प्रत्यय नुकताच आला आहे. बँकेने कर्ज मंजून न केल्याच्या (loan application rejected by bank) रागातून कर्नाटकातील एका व्यक्तीने भलतंच कृत्य केलं आहे. ज्यामुळे त्याला आता तुरुंगाची हवा खावी लागत आहे. तसेच पोलिसांनी त्याच्याविरोधात अनेक गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक (Accused arrested) केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. संबंधित घटना कर्नाटकातील (Karnataka) हावेरी जिल्ह्यातील आहे. येथील एका व्यक्तीने रविवारी बँकेलाच आग लावली (young man set bank on fire) आहे. कर्ज मिळवण्यासाठी केलेला अर्ज बँकेनं फेटाळून लावल्याच्या कारणातून तरुणानं हे भयंकर कृत्य केलं आहे. या संतापजनक घटनेनंतर कागिनेली पोलिसांनी आरोपी व्यक्तीला अटक केली असून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम 436, 477 आणि 435 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा-कॉलेजला जाण्याची तयारी केली पण घरातच आढळली मृतावस्थेत, युवतीचा हृदयद्रावक शेवट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्तीला कर्जाची गरज होती. त्यासाठी त्याने एका स्थानिक बँकेत कर्ज मिळवण्याठी अर्ज केला होता. पण कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, बँकेनं त्याचं कर्जाचा अर्ज नामंजूर केला. कर्ज न मिळाल्याच्या कारणातून आरोपीला संताप अनावर झाला. यावेळी रागाच्या भरात आरोपीनं थेट बँकेलाच आग लावली आहे. या धक्कादायक घटनेनंतर बँकेच्या सुरक्षा रक्षकाने आणि आसपासच्या लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. हेही वाचा-Pune: आधी बलात्कार केला मग कर्कटकाने शरीरावर दिल्या 25जखमा; नराधम जेलमध्ये सडणार याप्रकरणी कागिनेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध गंभीर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. आरोपीनं काही कागदपत्रांची पूर्तता न केल्यानंतर, त्याचं कर्ज नामंजूर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Karnataka

    पुढील बातम्या