SHIKARA : ...आणि 92 वर्षीय आडवाणींच्या डोळ्यात आलं पाणी!

SHIKARA : ...आणि 92 वर्षीय आडवाणींच्या डोळ्यात आलं पाणी!

या चित्रपटात 4000 हून अधिक काश्मिरी पंडित निर्वासितांनी अभियन केला आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : काश्मिरी पंडितांवरील तयार करण्यात आलेला चित्रपट 'शिकारा' काल प्रदर्शित झाला आहे. भाजपचे वरिष्ठ नेता लालकृष्ण आडवाणी यांना हा चित्रपट पाहताना रडू कोसळले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी काश्मिरी पंडितांसाठी बरंच काम केलं आहे. त्यावेळी भाजपनं हा विषय लावून धरला होता. अर्थातच आडवाणींसाठी हा अत्यंत जवळचा विषय आहे. त्यामुळे काश्मिरी पंडितांचे पलायल, त्यांचे हाल पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहताना त्यांचे डोळे पाणावले. देशाचे पूर्व उपप्रधानमंत्री आडवाणी आपली कन्या प्रतिभासोबत चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगसाठी गेले होते. काश्मिरी पंडितांचे दु:ख पाहून आडवाणींना आपले अश्रू रोखता आले नाही. दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी या भावनिक क्षणाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

विधू विनोद चोप्रा फिल्मच्यावतीने ट्विट करण्यात आले असून यामध्ये त्यांनी आडवाणींचे धन्यवाद व्यक्त केलं आहे. शिकाराच्या विशेष स्क्रिनिंगसाठी श्री. एल. के. आडवाणी उपस्थित राहिले. तुम्ही केलेलं कौतुक आणि आशीर्वाद दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत, असं या ट्विटमध्ये म्हटले आहे. याशिवाय आडवाणी शिकारा चित्रपट पाहत असताना आपले अश्रू थांबवू शकले नाहीत. या व्हिडिओमध्ये चोप्रा आडवाणींना सांभाळत असताना दिसले.

1990 साली काश्मिरी घाटातील काश्मिरी पंडितांच्या पलायनांसंदर्भात हा चित्रपट बनविण्यात आला आहे. यामध्ये 4000 अधिक काश्मिरी पंडित निर्वासितांनी अभियन केला आहे. एका नेता म्हणून आडवाणींनी काश्मिरी पंडितांचे दु:ख जवळून पाहिले आहे.

न्यायालयाकडून चित्रपटाला हिरवा कंदील

यापूर्वी शुक्रवारी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाने चित्रपटाचे प्रदर्शन रोखणारी याचिका फेटाळली आहे. तीन सामाजिक कार्यकर्त्यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती.

First published: February 8, 2020, 10:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading