Home /News /national /

भाजप MP च्या कार्यालयासमोरील बॉम्बहल्ल्याचे Live visuals; धार्मिक तेढ निर्माण करणारी केली होती पोस्ट

भाजप MP च्या कार्यालयासमोरील बॉम्बहल्ल्याचे Live visuals; धार्मिक तेढ निर्माण करणारी केली होती पोस्ट

सरकार गरीबांच्या नावावर योजना तर आखते पण याचा फायदा त्यांना मिळतो का? गरीब बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी तयार केलेली वीर चंद्र सिंह गढवाली योजनेचा लाभ भाजप आमदाराच्या पत्नीला दिला जात आहे.

सरकार गरीबांच्या नावावर योजना तर आखते पण याचा फायदा त्यांना मिळतो का? गरीब बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी तयार केलेली वीर चंद्र सिंह गढवाली योजनेचा लाभ भाजप आमदाराच्या पत्नीला दिला जात आहे.

या खासदाराच्या कार्यालयासमोर 25 बॉम्बहल्ले झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे..त्याचा लाइव्ह व्हिडीओ समोर आला आहेत

    नवी दिल्ली, 3 सप्टेंबर : भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी केलेल्या ट्विटनंतर देशभरात मोठा गदारोळ झाला आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी मंगळवारी एक ट्विट केलं होतं, त्यानुसार एका विशिष्ट धार्मिक समुदायाने पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद भागातील काली मातेचं मंदिर नष्ट केलं होतं आणि मंदिरातील मूर्ती जाळली आहे. या ट्विटनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यांच्या कार्यालयाबाहेर बॉम्बहल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये खासदाराने आरोप केला आहे की त्याला जीवे मारण्यासाठी त्याच्यावर हल्ला करण्यात आला. खासदार अर्जुन सिंह यांनी सांगितले की, 25 बॉम्ब फेकण्यात आले होते, सीआयएसएफने माझा जीव वाचवला, अन्यथा मी जगू शकलो नसतो. भाजप खासदार अर्जुन सिंह यांचा दावा मुर्शिदाबाद येथील काली मंदिराच्या व्यवस्थापकाने फेटाळला आहे. मंदिराचे सचिव शुकदेव वाजपेयी म्हणाले की, या भागात हिंदू व मुस्लीम लोक अत्यंत शांतीपूर्ण पद्धतीने राहतात. आणि कोणताच वाद नाही. ते पुढे म्हणाले की काही लोक आपल्या राजकीय फायद्यासाठी या घटनेलून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. खासदाराच्या ट्विटला उत्तर देत मंदिर व्यवस्थापकांनी सांगितले की, सत्य न तपासता वैयक्तित रुपात ट्विट शेअर करू नये. या प्रकारानंतर मुर्शिदाबाद पोलिसांनी खासगाराविरोधात फेक न्यूज पसरविण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP

    पुढील बातम्या