700 लोकांना सुरक्षित स्थळी पाठवले वडोदराचे जिल्हा दंडाधिकारी आरबी ब्रार यांनी सांगितले की, भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमुळे धुराच्या लोळात पडलेल्या सात जणांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून कारखान्याजवळील ग्रामीण भागात राहणाऱ्या सुमारे 700 लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. आगीचे कारण कळले नाही वडोदरा (Vadodara)अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, संध्याकाळी जेव्हा कारखान्यात आग (Gujarat Fire) पसरू लागली तेव्हा एक शक्तिशाली स्फोटही झाला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचंही त्यांनी सांगितलं. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.#WATCH | Huge explosion, followed by fire, occurs at Deepak Nitrite Company in Nandesari GIDC in Vadodara, Gujrat. Details awaited. pic.twitter.com/xNd55HJv9P
— ANI (@ANI) June 2, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.