मराठी बातम्या /बातम्या /देश /

आक्रोश, किंकाळ्या आणि मृत्यूची भीती! पाहा, आसाममधील बोट अपघाताचा LIVE VIDEO

आक्रोश, किंकाळ्या आणि मृत्यूची भीती! पाहा, आसाममधील बोट अपघाताचा LIVE VIDEO

आसाममध्ये (Assam) ब्रह्मपुत्रा (Brahmaputra river) नदीत झालेल्या भीषण बोट अपघाताचा व्हिडिओ (Video) कुणाच्याही काळजाचा थरकाप उडवेल, असा आहे.

  • Published by:  desk news

दिसपूर, 8 सप्टेंबर : आसाममध्ये (Assam) ब्रह्मपुत्रा (Brahmaputra river) नदीत झालेल्या भीषण बोट अपघाताचा व्हिडिओ (Video) कुणाच्याही काळजाचा थरकाप उडवेल, असा आहे. आसाममध्ये (Assam) दोन बोटींची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात (Accident) अनेकजण बेपत्ता (Missing) झाले आहेत. सुमारे 100 प्रवाशांना (100 commuters) घेऊन एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दोन बोटींची आमनेसामने जोरदार टक्कर झाली. या अपघातातील 43 जणांना वाचवण्यात यश आलं असून एक मृतदेह सापडल्याची माहिती आसामच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं जाहीर केली आहे. इतर बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे.

अपघाताचा थरारक व्हिडिओ

ज्या क्षणी अपघात झाला, त्यावेळी काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमधून या घटनेचं चित्रिकरण केलं. समोरून दुसरी बोट येत असल्याचं दिसल्यानंतर नागरिकांमध्ये उडालेला गोंधळ या व्हिडिओत स्पष्टपणे दिसतो आहे. काही कळायच्या आतच दोन बोटींची जोरदार टक्कर झाली आणि एक बोट अक्षरशः आडवी झाली. या बोटीतील नागरिक खाली घसरले.

एखाद्या थरारक चित्रपटातील प्रसंगासारखी घटना प्रत्यक्षात घडली. या अपघातात बोटीतील नागरिकांना इतका जोरदार धक्का बसला की त्यातील बहुतांश नागरिक उडून पाण्यात पडले. सध्या बोटीतील 50 पेक्षा जास्त नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तर तातडीनं बचावकार्य सुरू केल्याचं मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी म्हटलं आहे. दोन्ही बोटींवर मिळून नेमके किती नागरिक प्रवास करत होते, याचा आकडा अद्याप स्पष्टपणे समोर आलेला नाही. साधारण 100 ते 120 च्या आसपास नागरिक या बोटीत असल्याचा अंदाज वेगवेगळ्या घटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

First published:

Tags: Accident, Assam