हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना CBIने केली अटक

हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना CBIने केली अटक

आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम(P Chidambaram)यांना CBIने दिल्लीतून अटक केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट: आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम(P Chidambaram)यांना CBIने दिल्लीतून अटक केली. आज (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर 27 तासापासून बेपत्ता असलेले चिदंबरम यांनी स्वत:ची बाजू मांडण्यासाठी काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले.

चिदंबरम पत्रकार परिषद घेत असतानाच सीबीआयची टीम काँग्रेस मुख्यालयात दाखल झाली होती. सीबीआय टीम काँग्रेस मुख्यालयात पोहोचेपर्यंत चिदंबरम पत्रकार परिषद संपवून तेथून बाहेर पडले. त्यानंतर चिदंबरम त्यांची घरी गेले. त्यांचा पाठलाग करत सीबीआयची टीम त्यांच्या घरी पोहोचली आणि तेथूनच त्यांना अटक करण्यात आली. चिदंबरम यांना अटक करण्यासाठी सीबीआयची टीम त्यांच्या घरी पोहोचल्यावर दरवाजा उघडण्यात आला नाही. तेव्हा सीबीआयचे अधिकारी भिंतीवरून घरात शिरले. चिदंबरम यांच्या अटकेच्या कारवाई दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी घराबाहेर घोषणाबाजी सुरु केली होती. त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी अखेर दिल्ली पोलिसांना बोलवण्यात आली. चिदंबरम यांच्या घराजवळ 40 ते 45 मिनिटे झालेल्या हय व्होल्टेज ड्राम्यानंतर त्यांना अटक केली आणि सीबीआयच्या कार्यालयात घेऊन गेले.

त्याआधी चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. चिदंबरम यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. पण ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळेच चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम होती. सीबीआय आणि ईडीचं पथक मंगळवारी (20 ऑगस्ट) संध्याकाळी चिदंबरम यांना अटक करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलं होतं, पण तेव्हा ते घरात नव्हते. यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चिदंबरम यांच्या घराबाहेर नोटीस लावलं. या नोटीसमध्ये पुढील दोन तासांच्या आत हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते.

पत्रकार परिषदेत काय म्हणाले चिदंबरम

INX प्रकरणी माझ्यावरील सर्व आरोप खोटे

मी निर्दोष, मला व मुलाला फसवण्याचा प्रयत्न

माझ्या स्वातंत्र्याची गळचेपी करण्यात येत आहे

SPECIAL REPORT : मौका सभी को मिलता है!

First published: August 21, 2019, 9:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading