सुप्रीम कोर्टाची देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना नोटीस, उद्या सकाळी 10. 30 वाजता सुनावणी

सुप्रीम कोर्टाची देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना नोटीस, उद्या सकाळी 10. 30 वाजता सुनावणी

आजची सुनावणी पूर्ण झाली असून उद्या सकाळी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. आजची सुनावणी पूर्ण झाली असून उद्या सकाळी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.सर्वोच्च न्यायालयानं सर्व पक्षांना नोटीस दिली आहे. सोमवारी सकाळी 10.30 वाजता तुषार मेहता कागदपत्र सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. उद्या सकाळपर्यंत पाठिंब्याचं पत्र सादर करावं असं कोर्टानं सांगितलं आहे.

कोर्टात नेमकं काय घडलं.

पहिल्यादा कपिल सिब्बल यांनी न्यायालयात शिवसेनेची बाजू न्यायालयात मांडली आहे.' भाजपं आपलं बहुमत सिद्ध करू शकलं नाही. 22 तारखेला आम्ही पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं आमच्या सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील. राष्ट्रपती राजवट हटवण्याचा निर्णय योग्य नव्हता. राज्यपाल कुणाच्यातरी थेट इशाऱ्यावरुन निर्णय देत आहेत. असं म्हणत दिल्ली राज्यपाल कार्यालयाच्या वतीने आखण्यात आलेल्या वेळापत्रावर कपिल सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. महाराष्ट्रात जे घडलं ते लोकशाहीमध्ये होत नाही. कर्नाटकात जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा सुप्रीम कोर्टाने तात्काळ बहुमताची चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. यासाठी 24 तासांचा कालावधी दिला होता. हे उदाहरण सुप्रीम कोर्टाने निश्चित केलं होतं. राज्यपाल एका विशिष्ट पक्षाचा आदेश मानत आहेत. कर्नाटक केसप्रेमाणे यावेळी बहुमत सिद्ध करणार पत्र सादर करण्यात आलं नाही. शिवसेना कॉंग्रेस राष्ट्रवादी उद्याच बहुमत सिद्ध करु शकते.' असं कपिल सिब्बल यांनी कोर्टात शिवसेनेची बाजू मांडली आहे.

त्यानंतर अभिषेक मनू संघवी यांनी राष्ट्रवादीची बाजू मांडली आहे. 'राज्यपालांनी नियमांचं पालन केलं नाही. बोम्मई निकालानुसार विश्वासदर्शक ठराव घेणं हीच एकमेव पद्धत आहे. सगळयात ज्येष्ठ आमदार हेच हंगामी विधानसभाध्यक्ष आहेत. राज्यपालांनी सह्यांची खातरजमा करुन घ्यायला हवी होती. न्याय करायचा असेल तर तांत्रिक अडचणी पुढे करता येणार नाहीत.' अभिषेक मनू संघवी यांनी राष्ट्रवादीचं शनिवारी काढलेलं पत्र न्यायालयात सादर केलं.

गायब असलेल्या राष्ट्रवादीच्या एका आमदाराचा VIDEO आला समोर, केला हा खुलासा

भाजप आणि अपक्ष आमदारांतर्फे मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. 'गायब असलेले दौलत दरोडा परतले आणि शरद पवार सोबत असल्याचं म्हटलं आहे. तुम्ही बरेच दिवस सत्ता स्थापनेसाठी काही हालचाली केल्या नाहीत. एका बाजूला तुम्ही म्हणता की सरकार सथापन झालं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला म्हणता की सरकार स्थापन चुकीचं. राज्यपालांच्या निर्णयाला वैधानिक संरक्षण आहे. शमशेर प्रकऱणात नियुक्तीचा निर्णयाला न्यायालयीन कार्यकक्षेत आव्हान मिळू शकत नाही हे स्पष्ट झाले आहे. हे प्रकऱण संपूर्णपणे विधीमंडळाच्या कक्षेत आहे. विरोधकांनी न्यायमूर्तींचा रविवार वाया घालवला. विरोधक कोणत्याही रिसर्चशिवाय कोर्टात आले आहेत. तीन आठवडे विरोधक झोपलेले होते आणि आज अचानक ते याचिका दाखल करत आहेत. आम्हाला आमचा रविवार शांततेत घालवू द्या,' असंही न्यायालयात रोहतगी म्हणाले.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 24, 2019, 12:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading