LIVE NOW

येडियुरप्पा कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाने भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येदियुरप्पा यांचा शपथविधी समारंभ रोखण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सध्याच्या वेळापत्रकानुसार येदियुरप्पा सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

Lokmat.news18.com | May 17, 2018, 10:00 AM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated May 17, 2018
auto-refresh

Highlights

मुंबई, 17 मे : सर्वोच्च न्यायालयाने भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडियुरप्पा यांचा शपथविधी समारंभ रोखण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सध्याच्या वेळापत्रकानुसार येडियुरप्पा आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या प्रकरणाची पुढील सुनावणी आज सकाळी 10.30 वाजता होणार आहे. दरम्यान, आमदारांची यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश न्यायालयाने दोन्ही पक्षांना दिले आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारचा शपथविधी सोहळा रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मध्यरात्री सत्तेचा हाय होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. कर्नाटकात राज्यपालांनी भाजपाला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस आणि जेडीएसनं दाखल केलेल्या याचिकेवर मध्यरात्री पावणे दोन वाजता सुनावणी घेण्यात आली. न्या. ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण आणि न्या. बोबडे या तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. दरम्यान, येडियुरप्पांचा शपथविधी रोखता येणार नसल्याचं खंडपीठानं यावेळी स्पष्ट केलं. मात्र, काँग्रेस-जेडीएसची याचिका खंडपीठानं फेटाळलेली नाही. तर या याचिकेवर नंतर सुनावणी घेण्यात येणार असल्याचं खंडपीठानं स्पष्ट केलं. त्यामुळे येडियुरप्पा आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यावर यावर शिक्कामोर्तब झाला आहे. संबंधित बातम्या कर्नाटकच्या राज्यपालांवर राजकीय दबाव, काँग्रेसचा आरोप कर्नाटकचे राज्यपाल भाजपच्याच बाजूने -राज ठाकरे

राज्यपालांचं भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण, येडियुरप्पांचा उद्या शपथविधी

काँग्रेस-जेडीएसकडून आमदारांचं समर्थन पत्र सादर,राज्यपाल घेणार कायदेशीर सल्ला

कर्नाटकसाठी काँग्रेसचा प्लॅन बी तयार, घेणार सुप्रीम कोर्टात धाव

जेडीएसच्या आमदारांना भाजपकडून १०० कोटींची ऑफर- एच.डी.कुमारस्वामी

9:14 am (IST)

#KarnatakaCMRace : राहुल गांधींचा भाजपवर हल्ला ,भाजप पोकळ विजयाचा आनंद साजरा करत आहे, राहुल गांधींची ट्विटरवरुन टीका


9:05 am (IST)
9:05 am (IST)
8:57 am (IST)
Load More

Live TV

News18 Lokmat
close