नवी दिल्ली, 17 मे : निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराच्या तोफा थंड व्हायच्या अगदी काही क्षण आधी काँग्रेस आणि भाजपने पत्रकार परिषद घेतली. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी नेमकी एकाच वेळी पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधींनी या संधीचा फायदा घेत आपल्या प्रेस कॉन्फरन्समधून मोदींना प्रश्न विचारले.
नरेंद्र मोदी पहिल्यांदाच भाजपच्या पत्रकार परिषदेत हजेरी लावणार असल्यामुळे भाजपच्या प्रेस कॉन्फरन्सबद्दल उत्सुकता होती.
मोदींनी पहिल्यांदाच अमित शहांबरोबर पत्रकार परिषदेत ठरवलं ही चांगली गोष्ट आहे, असं राहुल म्हणाले. मोदींनी या दृष्टीनं टाकलेलं पहिलं पाऊल ही चांगली गोष्ट, असं ते हसत म्हणाले.
नेमक्या त्याच वेळी राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू झाली. मोदींना पत्रकार स्पष्ट प्रश्न विचारत नाही, याविषयी राहुल यांनी नाराजी व्यक्त केली. माझ्या तरी प्रश्नांची उत्तरं देताहेत का बघू म्हणून त्यांनी काही प्रश्न विचारले. राहुल यांनी मोदींना प्रश्न विचारण्याची संधी सोडली नाही. मोदी कुठल्या जगात असतात माहिती नाही, असं म्हणत बालाकोटच्या ढगांच्या मुद्द्यावरून मोदींनी केलेल्या वक्तव्याची राहुल गांधींनी बाकं वाजवून खिल्ली उडवली.
"आंबा कसा खातो, कुर्ता कसा घालतो या प्रश्नांची उत्तरं मोदी देतात. पण महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. आत्ता मला कुणीतरी सांगितलं की, मोदींच्या पत्रकार परिषदेपूर्वी तिथले दरवाजे म्हणे बंद करून घेतले आहेत, नाहीतर इथून काही पत्रकारांना तिथे पाठवलं असतं", असंही राहुल म्हणाले.
LIVE: Congress President @RahulGandhi addresses media after his last rally for 2019 Lok Sabha elections. https://t.co/cwEOl9xis3
— Congress (@INCIndia) May 17, 2019
राहुल यांच्या परिषदेतले मुद्दे
मोदीजी माझ्याबरोबर डिबेट का नाही करत?
राफेल प्रकरणात माझ्या प्रश्नांची उत्तरं मोदींनी का नाही दिली?
मोदींना फक्त ते आंबे कसे खातात, कुर्ते कुठून घेतात वगैरे प्रश्न विचारले का जातात?
पंतप्रधान कोण होणार, हे मी सांगणार नाही. हे देश ठरवेल.
मी देशाच्या नागरिकांनी दिलेल्या निर्णयाचा आदर करतो.
मी नरेंद्र मोदी नाही. मी अनुभवी व्यक्तींना धक्का मारून बाहेर काढत नाही.
जनता मालक आहे. २३ तारखेला जनतेची व्हिजन स्पष्ट होईल.