S M L

LIVE : उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान मोदी यांनी एनआयए या वृत्तसंस्थेला विशेष मुलाखत दिली.

Updated On: Jan 1, 2019 06:04 PM IST

LIVE : उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

नवी दिल्ली, 01 जानेवारी : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यावर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. "उर्जित पटेल यांचा राजीनामा हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता",असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी एनआयए या वृत्तसंस्थेला विशेष मुलाखत दिली. ANIच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी पंतप्रधानांची ही प्रदीर्घ मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक आणि आगामी निवडणुकांवर भाष्य केलं आहे.

या मुलाखतीत त्यांना उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, "उर्जित पटेल यांच्यावर कोणताही दबाव नव्हता. ते सहा महिन्यांपासून राजीनामा देण्याच्या तयारीत होते. त्यांच्या हा निर्णय वैयक्तिक होता"




पाकिस्तानवर टीका

"एका लढाईने पाकिस्तानला धडा मिळणार नाही. पाकिस्तानला सुधारण्यासाठी खूप वेळ लागेल", असंही मोदी म्हणाले.

Loading...



सर्जिकल स्ट्राईक

"सर्जिकल स्ट्राईक करणं ही मोठी जोखीम होती. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकची तारीख दोनदा बदलली होती. मला जास्त काळजी आपल्या जवानांच्या जीवाची होती. पण, मला राजकीय जोखमीची चिंता नसते. जवानांच्या जीवाची मला जास्त काळजी होती", असं पंतप्रधानांनी सांगितलं. मोदींना रात्रभऱ सर्जिकल स्ट्राईकचे LIVE अपडेट्स मिळत होते, अशी माहिती त्यांनी स्वतः दिली. आपले जवान सीमेपलीकडे असताना एक तास काहीच अपडेट्स मिळत नव्हते, तेव्हा चलबिचल वाढली होती, असंही त्यांनी सांगितलं.



उर्जित पटेल राजीनामा प्रकरण

उर्जित पटेल यांनी खासगी कारणांसाठी आपण राजीनामा देत असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आरबीआयच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते.

20 आॅगस्ट 2016 रोजी उर्जित पटेल यांनी आरबीआयच्या गव्हर्नरपदाचा कारभार स्विकारला होता. त्यांच्या नियुक्तीनंतर आरबीआय आणि सरकारमध्ये खटके उडाले होते. मध्यंतरी रिझर्व बँक आणि सरकार यांच्यातला तणाव वाढला होता. सरकार RBIला इथून पुढेही सल्ले देत राहील, अशी स्पष्टोक्ती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली होती. त्यामुळे हा वाद आणखी पेटला. त्यानंतर 10 डिसेंबर रोजी त्यांनी राजीनामा दिला.


=================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2019 05:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close