मराठी बातम्या /बातम्या /देश /

5 वाजता टीव्ही डिबेटवर LIVE आणि 7.30 वाजता आला हार्ट अटॅक; काँग्रेस नेत्याचा शेवटचा VIDEO VIRAL

5 वाजता टीव्ही डिबेटवर LIVE आणि 7.30 वाजता आला हार्ट अटॅक; काँग्रेस नेत्याचा शेवटचा VIDEO VIRAL

राजीव त्यागी यांचा टीव्ही डिबेटमधील शेवटचा VIDEO पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे

राजीव त्यागी यांचा टीव्ही डिबेटमधील शेवटचा VIDEO पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे

राजीव त्यागी यांचा टीव्ही डिबेटमधील शेवटचा VIDEO पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे

    नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते राजीव त्यागी यांचं बुधवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबरच सर्वांसाठी ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाच्या काही तासांपूर्वी ते एका वृत्तवाहिनीवर लाइव्ह होते. तेव्हाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. साधारण सायंकाळ 5 वाजता ते एका टीव्हीवर एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत Live होते. त्यानंतर अवघ्या काही तासाच्या अंतराने त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला व त्यातचं त्यांचं निधन झालं. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. अगदी संध्याकाळपर्यंत ते कार्यरत होते. एका टीव्ही चॅनेलच्या शोमध्ये चर्चेत काँग्रेसची बाजू मांडायला ते तयार होते. त्याबद्दल त्यांनी केलेलं Tweet च शेवटचं ठरलं. टीव्ही चॅनलवर बंगळुरुमध्ये झालेल्या घटनेसंदर्भात यावेळी चर्चा सुरू होती. यावेळी ते हिरहिरीने काँग्रेसची बाजू मांडत होते. राजीव त्यागी यांच्या अचानक जाण्याने आम्हाला प्रचंड दुःख झालं आहे. ते कट्टर काँग्रेसी आणि सच्चे देशभक्त होते. त्यागींच्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं Tweet काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलं आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी याबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांना आताच टीव्हीवर पाहिलं होतं आणि काही तासात त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Congress

    पुढील बातम्या