हवाई दलाच्या तळाजवळ आढळला जिवंत बॉम्ब

हवाई दलाच्या तळाजवळ आढळला जिवंत बॉम्ब

या बॉम्बची तपासणी करण्यासाठी हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

  • Share this:

बिकानेर, 03 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून भारतीय सैन्याच्या तळांना टार्गेट केले जात आहे. दरम्यान आज सकाळी राजस्थानातील नाल-बिकानेर येथील हवाई दलाच्या तळावजवळ एक जिवंत बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतचा अधिक तपास हवाई दलाचे अधिकारी करत असून अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही. यासंबंधी पोलीस अधिक्षक प्रदिप शर्मा यांनी, गंगानगर बाह्यवळणाजवळ हा जिवंत बॉम्ब सापडला असल्याची माहिती दिली. दरम्यान यासंबंधी आम्ही लष्कराला कळवले असून बॉम्ब पथकानं हा जिवंत बॉम्ब जप्त केला आहे, अशी माहिती दिली.

याआधी दशहतवाद्यांनी पठाणकोट आणि उरी येथील लष्करी तळावर हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले होते. यातच सकाळी हवाई दलाच्या तळाजवळ आढळून आलेल्या या जिवंत बॉम्बमुळं खळबळ उडाली आहे.

दरम्यान, 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात निमलष्करी दलाचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर पाकिस्तानात घुसून भारतानं एअर स्ट्राईक करत जैश-ए-मोहम्मदचेा तळ उद्धवस्त केलेा होतेा. त्यामुळं आता या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांकडून भारतातील सैन्य तळांना टार्गेट केले जाण्याची शक्यता वर्तवली जात असल्यानं, देशभरात अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला होता. दरम्यान आज सापडलेला बॉम्ब कोणी ठेवला होता, याबाबत चौकशी सुरू आहे.

VIDEO : 'माझा मुलगा 24-25 वर्षांचा नाही, त्याला भाषणही करता येतं', विखेंचा पवारांना टोल

First published: April 3, 2019, 11:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading