• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • LIVE: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, 'आरे बचाव' आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे

LIVE: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, 'आरे बचाव' आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...

 • News18 Lokmat
 • | September 30, 2020, 21:01 IST
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:17 (IST)

  मुंबईत आज कोरोनाचे 2654 नवे रुग्ण आढळले
  मुंबईत दिवसभरात कोरोनामुळे 46 रुग्णांचा मृत्यू
  मुंबईत आज 2066 रुग्ण कोरोनामुक्त
  मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,05,142 वर

  21:49 (IST)

  रायगड - होंडा सिटी कारमध्ये गुदमरून 2 चिमुकल्यांचा मृत्यू, खेळताना कारमध्ये बसले असताना दरवाजे लॉक झाल्याचा प्राथमिक अंदाज, महाड औद्योगिक वसाहत पोलिसांकडून अधिक तपास सुरू

  20:19 (IST)

  'आरे'मधल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे; कॅबिनेटमध्ये निर्णय

  20:17 (IST)
  'अनलॉक-5'ची केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर - 15 ऑक्टोबरनंतर जर एखाद्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये 100 पेक्षा जास्त लोक येत असतील तर यासंदर्भात राज्य सरकार घेऊ शकतं निर्णय, 15 ऑक्टोबरपासून जलतरणपटूच्या सरावासाठी स्विमिंग पूलदेखील उघडता येणार
  20:10 (IST)

  'अनलॉक-5'ची केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर
  कंटेन्मेंट झोनमध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन कडक
  देशभरात 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृहं सुरू होणार
  50 टक्के क्षमतेनं सुरू करण्यास केंद्राची परवानगी
  15 ऑक्टोबरनंतर शाळा उघडण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकतं

  19:41 (IST)

  'अनलॉक-5'ची राज्य सरकारकडून नियमावली जाहीर
  5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू होणार
  50 टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी
  मुंबईच्या डबेवाल्यांना ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा
  डबेवाल्यांना लोकल प्रवासासाठी QR कोड दिले जाणार
  मेट्रो, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल बंद राहणार
  'अनलॉक-5'ची राज्य सरकारकडून नियमावली जाहीर
  एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एक्स्प्रेसनं जाता येणार
  अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल वाढवणार
  पुणे विभागातील लोकल ट्रेन सुरू होणार
  शाळा आणि कॉलेजेस 31 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार
  राज्यात ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरू राहणार
  MMR क्षेत्रात उद्योग, उत्पादन कंपन्या पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी

  19:17 (IST)

  नाशिक - शेतकऱ्यांना आधार पीक कर्जाचा
  नाशिक जिल्ह्यात विक्रमी पीककर्ज वाटप
  नाशिक जिल्ह्यात 2200 कोटींचा टप्पा केला पार
  गेल्या वर्षीपेक्षा यंदा 658 कोटींचं अधिक वाटप
  गेल्या 10 वर्षांतील विक्रमी वाटप रक्कम -जिल्हाधिकारी

  19:13 (IST)

  उद्यापासून मध्य रेल्वेवर अतिरिक्त 8 लोकल धावणार
  अतिरिक्त लोकलमध्ये 2 लेडीज लोकलचा समावेश
  CSMT-कल्याण, कल्याण-CSMT लेडीज लोकल धावणार
  आता मध्य रेल्वेच्या कोरोनाकाळातील लोकलची संख्या 431

  19:6 (IST)

  देशात 1 जून ते 30 सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 109 टक्के पाऊस
  36 पैकी 31 उपविभागांत सरासरी इतका किंवा जास्त पाऊस
  यवतमाळ, अकोला, अमरावतीवगळता इतर जिल्ह्यांत जास्त पाऊस
  पुणे जिल्ह्यात 39 तर पुणे शहरात 236 मिमी जास्त पाऊस

  19:2 (IST)

  मुंबई महापालिकेनं घेतले महत्वाचे निर्णय
  'खाटांची उपलब्धता डॅशबोर्डवर उपलब्ध नसल्यास कारवाई'
  'कंटेन्मेंट झोनच्या इमारतीमधील ये-जा करण्यावर कठोर निर्बंध'
  'सोसायटीला सफाई कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट बंधनकारक'
  लिफ्टमन, सुरक्षारक्षकांची कोरोना टेस्टही बंधनकारक -पालिका
  'वाहतूक नियोजनासाठी 1000 एसटी बस भाडेतत्वावर'
  कोरोना संदर्भात वैद्यकीय चाचण्या वाढवणार -मुंबई पालिका

  कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...