अहमदाबाद, 26 ऑक्टोबर : गुजरात उच्च न्यायालयात सोमवारी चीफ जस्टिस विक्रम नाथ यांच्या कोर्टाच्या कारवाईची लाइव्ह स्ट्रीमिंगची सुरुवात केली आहे. उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हे पाऊल उचललं आहे. सर्वोच्च न्यायालयाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेला सुनावणी पाहण्याची परवानगी मिळायला हवी असे सांगितले होते, यासाठी उच्च न्यायालयाला याबाबतचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे आजपासून जनताही गुजरात हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी होई शकते व सुनावणी ऐकू शकते. हायकोर्टाची ही सुनावणी YouTube वर Live पाहता येणार आहे.
उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जारी केल्यानुसार यामध्ये निरमा यूनिवर्सिटीतील लॉचे विद्यार्थी पृथ्वीराज सिंह जाला यांच्या एका पीएलआयचाही उल्लेख आहे. कोर्टाच्या कारवाईच्या लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी सर्वोच्च कोर्टाने निर्देश जारी करण्याची विनंती केली होती. पृथ्वीराज सिंह जाला यांनी आपल्या या विनंतीच्या आधाराने न्याय आणि ओपन कोर्टाच्या सिद्धांतांचा हवाला दिला होता.
हे ही वाचा-आदित्य ठाकरेंना 'बेबी पेन्ग्विन' म्हणणाऱ्याला अटक, अमृता फडणवीसांनी केली पाठराखण
सध्या कोरोनाच्या महासाथीत सर्वोच्च न्यायालयापासून ते उच्च न्यायालयापर्यंत वर्च्युअल सुनावणी सुरू आहे. या वर्च्युअल सुनावणीदरम्यान अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर वादही सुरू आहे. आणि अनेक निर्णयांचीही सुनावणी करण्यात आली आहे. ही वर्च्युअल सुनावणी सार्वजनिक करण्यात यावी, अशी मागणी बराच काळापासून सुरू होती. दरम्यान देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. काल (25 ऑक्टोबर) 24 तासांत देशात 50 हजार 129 नवीन रुग्ण सापडले. तर, 578 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील नवीन रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल आणि दिल्लीमध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दुसरीकडे देशाताल रिकव्हरी रेट 90% आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.