हैदराबाद : जिथं बलात्कार झाला तिथंच आरोपींचा एन्काऊंटर, पाहा घटनास्थळाचा VIDEO

हैदराबाद : जिथं बलात्कार झाला तिथंच आरोपींचा एन्काऊंटर, पाहा घटनास्थळाचा VIDEO

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपी पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार झाले आहेत. याबाबतची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे.

  • Share this:

हैदराबाद, 06 डिसेंबर : हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिस एन्काऊंटरमध्ये जागीच ठार झाले. न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी त्यांना घटनास्थळी आणले होते. तपास सुरू असताना पोलिसांच्या तावडीतून निसटण्याची त्यांची योजना होती. तेव्हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असेलेले आरोपी पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार झाले. याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे.

बलात्कार प्रकरणातील आरोपींनी गुन्हा कसा केला हे दाखवण्यासाठी घटनास्थळी नेलं होतं. त्यावेळी तपास सुरु असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी जागीच ठार झाले. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली होती. हैदराबाद बलात्कार प्रकरणानंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात होती.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि निर्घृण खुनाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. आरोपींना कडक शासन व्हावं यासाठी अनेक जण रस्त्यावर उतरले आहेत. आता या प्रकरणात त्या रात्री नेमकं काय घडलं हे हळूहळू समोर येत आहे.

27 नोव्हेंबर रोजी रात्री 4 नराधमांनी 25 वर्षांच्या महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर त्यांचा खून केला. यानंतर पीडित महिला डॉक्टरांचं मृत शरीरही जाळण्यात आलं. घटनेपूर्वी आरोपींनी काय कट रचला याबद्दल पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली आहे. दरम्यान, सोमवारी शवविच्छेदनानंतर महिला डॉक्टरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेच्या अगोदर महिला डॉक्टरने शेवटच्या क्षणी तिच्या धाकट्या बहिणीशी फोनवर बोलणं केलं होतं. यात आता खळबळजनक माहिती समोर आली.

महिला डॉक्टरांच्या धाकट्या बहिणीने घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, 'दीदीने रात्री 9.20 च्या सुमारास फोन केला होता आणि सांगितले होते की तिची गाडी पंचर झाली आहे. जे लोक तिची मदत करण्यासाठी पुढे आले होते, ते संशयास्पद वाटत आहेत. मी तिला फोन बंद करू नको आणि माझ्याशी बोलत रहा असं सांगितलं. पण, फोनची बॅटरी कमी असल्यामुळे आमचा संपर्क तुटला. त्यानंतर जे काही घडलं त्याने मी हादरले आहे. हे सगळं सांगताना बहिणीला रडू आवरलं नाही तर असा घाणरडं कृत्य कोणासोबतही होऊ नये असं तिनं म्हटलं आहे.

Published by: Suraj Yadav
First published: December 6, 2019, 8:36 AM IST
Tags: hyderabad

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading