• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • कानपूरचं 'चमत्कारिक मॉन्सून मंदिर', शास्त्रज्ञांसाठीही गूढ, देतं पावसाची अचूक माहिती

कानपूरचं 'चमत्कारिक मॉन्सून मंदिर', शास्त्रज्ञांसाठीही गूढ, देतं पावसाची अचूक माहिती

Monsoon Temple ही केवळ मान्यता नसून यात विज्ञानही आहे. मंदिर तयार करताना याची काळजी घेण्यात आली आहे. मंदिराच्या भिंती आणि छत तशा प्रकारे तयार करण्यात आलं आहे. त्यामुलं मॉन्सून सुरू होण्याच्या 5-7 दिवसांपूर्वीच इथं संकेत मिळतो.

 • Share this:
  कानपूर, 11 जून : आपला भारत देश हा मंदिरांचा देश म्हणून ओळखला जातो. याठिकाणी आपल्या भक्ती आणि आस्थेची प्रतिकं असलेली असंख्य अशी सुंदर मंदिरं (Temples) आहेत. प्रत्येक मंदिराचं वेगळं महत्त्व आणि वेगळी अख्यायिका. यातील काही मंदिरं ही वास्तुकलेचे अप्रतिम नमुने आहेत. तर काही वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्व असलेलेदेखिल आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये (Kanpur) एक असं मंदिर आहे, जे मॉन्सूनची अत्यंत अचूक (Monsoon Temple) अशी माहिती देत. भारतीय पुरातत्व विभागानं जतन केलेल्या वारसा स्थळांमध्ये समावेश असलेलं हे मंदिर शास्त्रज्ञांसाठीही गूढ ठरलं आहे. (वाचा-कोरोना काळात महागाईनं मध्यमवर्गाचं कंबरडं मोडलं; किराणा 50 टक्क्यांनी महाग) बेहटा बुजुर्ग गावात आहे जगन्नाथ मंदिर कानपूरपासून अंदाजे 50 किलोमीटर दूर असलेल्या या मंदिराला मॉन्सून मंदिर म्हणूनही ओळखतात. या मंदिरात भगवान जगन्नाथाची मूर्ती आहे. तर मंदिराच्या छतावर मॉनसून दगड आहे. या दगडावरून खाली पडणाऱ्या थेंबांवरून पाऊस किती याचा अंदाज लावला जातो. जर जास्त थेंब पडले तर जास्त पाऊस होण्याची शक्यता असते. ही केवळ मान्यता नसून यात विज्ञानही आहे. मंदिर तयार करताना याची काळजी घेण्यात आली आहे. मंदिराच्या भिंती आणि छत तशा प्रकारे तयार करण्यात आलं आहे. त्यामुलं मॉन्सून सुरू होण्याच्या 5-7 दिवसांपूर्वीच इथं संकेत मिळतो. (वाचा-आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, मराठा आरक्षण मुद्द्यावरून नितीन राऊत आक्रमक) 4200 वर्षांचा इतिहास असं म्हटलं जातं की हे मंदिर अनेकदा तोडण्यात आलं आणि पुन्हा त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. जेव्हा देशामध्ये बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणावर होता, तेव्हाच्या स्थापत्य कलेचा प्रभावही मंदिरात आहे. मंदिराच्या दगडांच्या कार्बन डेटिंगमुळं ते 4200 वर्षे जुनं असल्याचं समजतं. मंदिर तीन भागांत तयार केलेलं आहे. गर्भगृहाचा लहान भाग, नंतर मोठा भाग आहे. हे वेगवेगळ्या काळात तयार केले आहेत. इथं विष्णूची मूर्ती स्थापित आहे. विष्णूच्या 24 अवतारांच्या आणि पद्मनाभ स्वामींची मूर्ती आहे. मंदिराची देखभाल करणारे केपी शुक्ला यांनी सांगितलं की, मंदिराच्या इतिहासाबाबत मतभेदही आहेत. जुन्या काळापासून विविध राजांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिरात दगडी पद्म चिन्हंदेखिल आहे. अशा चिन्हांची पुजा सिंधु संस्कृतीमध्ये केली जायची, असं सांगितलं जातं. संशोधनासाठी येतात शास्त्रज्ञ मंदिराला मॉन्सूनच्या भविष्यवाणीसाठी ओळखलं जातं. तसंच शिखरावरील सूर्यचक्राचंही महत्त्व सांगितलं जातं. या सूर्यचक्रामुळं कधीच मंदिरावर वीज पडत नाही, असं म्हटलं जातं. मंदिर रथाच्या आकारातील आहे. लांबून भाविक इथं येतात.  भारतीय पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्याच्या मते याठिकाणी शास्त्रज्ञ नेहमी येत जात असतात. पण त्यांना फार काही माहिती मिळालेली नाही. सध्या हे मंदिर सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी एक तासच उघडं असतं.
  Published by:News18 Desk
  First published: