चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात राजस्थानने बाजी मारली आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वाखालील चेन्नईला आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईने दिलेल्या 126 धावांचा राजस्थानने 3 विकेट्स गमावून यशस्वी पाठलाग केला. आणखी एका पराभवामुळे यंदाच्या सीझनमध्ये चेन्नईच्या आशा साखळी सामन्यांमध्येच गारद होण्याची शक्यता आहे.