LIVE NOW

LIVE UPDATE : भारत बंदला हिंसक वळण, आंदोलकांनी फोडली बस पाहा VIDEO

देशातल्या मोठ्या कामगार संघटनांनी आज देशव्यापी 'बंद'ची (bharat bandh) हाक दिली आहे.25 कोटी लोक या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. या बंदमुळे प्रामुख्याने बँकिंग क्षेत्रावर परिणाम होईल.

Lokmat.news18.com | January 8, 2020, 12:31 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated January 8, 2020
auto-refresh

Highlights

12:29 pm (IST)
12:22 pm (IST)
Load More
नवी दिल्ली, 8 जानेवारी : देशातल्या मोठ्या कामगार संघटनांनी बुधवारी देशव्यापी 'बंद'ची हाक दिली आहे. या बंदमुळे प्रामुख्याने बँकिंग क्षेत्रावर परिणाम होणार आहे. बँक कर्मचारी संपात सहभागी होणार असल्यानं ATM सेवेवर मोठा ताण येण्याची चिन्हं आहेत. देशातल्या 10 मोठ्या कामगार संघटनांनी एकत्रितपणे बंदची हाक दिली आहे. 25 कोटी लोक या बंदमध्ये सहभागी होतील, असं या संघटनांचं म्हणणं आहे. जनतेविरोधातल्या धोरणांच्या निषेधार्थ भारत बंद करत आहोत, असं या संघटनांनी एकत्रितरीत्या काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF, UTUC या आणि इतर स्थानिक संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. एअर इंडिया विकण्याची अगोदरपासूनच चर्चा आहे. रेल्वेचंही खासगीकरण करण्याच्या तयारीत सरकार आहे. BSNL-MTNL विलीनीकरण झाल्याने 93600 कामगारांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. या खासगीकरण धोरणाविरोधात आजाचा बंद आहे, असं पत्रकात म्हटलं आहे. सेंट्रल ट्रेड युनियन - सीटूच्या (CITU) वतीने पत्रक प्रसिद्धीस देण्यात आलं आहे. कर्माचाऱ्यांच्या 12 विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशभारातील उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढणार असल्यामुळे हा संप करत असल्याचं कामगार नेते विश्वास उटगी म्हणाले.
corona virus btn
corona virus btn
Loading