मध्य प्रदेशात काँग्रेसने केला सत्ता स्थापन करण्याचा दावा

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांचे क्षणाक्षणाचे ताजे अपडेट्स या LIVE ब्लॉगमधून पाहता येतील. लोकसभेची सेमीफायनल म्हणून या निकालांकडे साऱ्या देशाचं लक्ष आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 12, 2018 08:04 AM IST

मध्य प्रदेशात काँग्रेसने केला सत्ता स्थापन करण्याचा दावा

मुंबई,11 डिसेंबर : मध्य प्रदेशचं संपूर्ण चित्र रात्री 12 वाजेपर्यंत स्पष्ट होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. संध्याकाळ झाली तरी मध्य प्रदेशचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आता याबाबत निवडणूक आयोगाने थेट पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. सर्व राऊंडमधील मतमोजणी पूर्ण होऊन हे चित्र स्पष्ट व्हायला रात्री 12 वाजतील, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. सध्या मध्य प्रदेशात काँग्रेस 114 तर भाजप 109 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, मध्य प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष कमलानाथ यांनी मध्य प्रदेशच्या राज्यपाला आनंदीबेन पटेल यांना पत्र सादर करून सत्ता स्थापनेचा दाव केला आहे.

राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवत भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांची सत्ता सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांनी उलथवून लावली आहे. त्यामुळे तर वसुंधरा राजे यांनी राजीनामा दिला आहे. भाजपच्या ताब्यात असलेली ही दोन्ही राज्य काँग्रेसने ताब्यात घेतली आहे. तर मध्य प्रदेशमध्येही काँग्रेस भाजपला आस्मान दाखवले आहे. काँग्रेसने 114 जागा जिंकून सत्तेसाठी दावा ठोकला आहे. पण भाजपनेही आपली पत राखत काठावर पास झाली आहे. परंतु, या दोन्ही पक्षांना बहुमत मिळाले नसल्यामुळे सत्ता कोण स्थापन करणार याचा पेच निर्माण झाला आहे. तर तेलंगणामध्ये टीआरएसने 87 जागा जिंकत एकहाती सत्ता राखली आहे. तर मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटने सर्वाधिक जागा जिंकत एकहाती सत्ता राखली आहे.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 06:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...