समुद्राचा VIDEO शूट करणाऱ्या मुलीच्या कॅमेऱ्यात कैद झाला वडिलांचा मृत्यू, अपघाताचा थरारक व्हिडिओ

व्हिडिओ आणि निसर्ग पाहण्याच्या नादात वडिलांना समोरून येणारा ट्रक दिसला नाही. त्यात कारही वेगात होती. त्यामुळे जोरात धडक झाल्यामुळे यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 29, 2019 06:56 PM IST

समुद्राचा VIDEO शूट करणाऱ्या मुलीच्या कॅमेऱ्यात कैद झाला वडिलांचा मृत्यू, अपघाताचा थरारक व्हिडिओ

गीर सोमनाथ (गुजरात) 29 सप्टेंबर : अपघाताचे अनेक भीषण व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. बीचवर कारने फिरताना मुलगी त्याचा व्हिडिओ शूट करत होती आणि तिचे वडिल गाडी चालवत होते. यातच समोरून येणाऱ्या गाडीला धडक झाली आणि यात वडिलांचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. खरंतर हा व्हिडिओ 26 सप्टेंबरचा आहे. पण अजूनही सोशल मीडियावर हा तुफान व्हायरल होत आहे.

या अपघातामुळे सगळीकडे शोककळा पसरली आहे. बापलेक हे बीचवर फिरण्यासाठी गेले. त्यावेळी वडिल गाडी चालवत होते आणि मुलगी व्हिडिओ काढत होती. पण व्हिडिओ आणि निसर्ग पाहण्याच्या नादात वडिलांना समोरून येणारा ट्रक दिसला नाही. त्यात कारही वेगात होती. त्यामुळे जोरात धडक झाल्यामुळे यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हा संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे. या व्हिडिओ आणि अपघात इतका भीषण होता की अपघात झाल्यानंतर मुलगी मोठ्याने ओरडत होती पण वडिलांनी जागीच जीव सोडला.

कारची ट्रकला भीषण धडक, अपघातात 4 जण जागीच ठार

परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. याच मुसळधार पावसामुळे अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे. अहमदनगरच्या दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद परिसरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 4 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती देण्यात आली  आहे. हे चारही जण एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

Loading...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर दौंड महामार्गावरील बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्तीजवळ ट्रक (MP 09 HH 8378) आणि कारचा (MH 04 BY 4857) भीषण अपघात झाला. अपघातात नगर जवळील भिंगारचे तीन तर नगर तालुक्यातील वाळकी इथला एकजण असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी धाव घेतली. यांनी अपघातग्रस्तांना सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात मदत केली. अपघातात भिंगारचे तिघे जागीच ठार झाल्याने भिंगारवर शोककळा पसरली आहे.

अपघातातील फोटो पाहिला असता मागून येणाऱ्या कारने ट्रकला धडक दिला असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. कारने जोरात ट्रकला धडक दिल्यामुळे यात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कारमधील 4 ही जण श्रीगोंद्यावरून नगरकडे येत असताना हा अपघात झाला. या अपघाताची माहिती पोलिसांना दिली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस आता या अपघाताची चौकशी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 02:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...