मोदींचं ऐकलं आणि 2 इंजिनीअर मुलांनी नोकरी सोडून सुरू केलं भंगारचं दुकान

मोदींचं ऐकलं आणि 2 इंजिनीअर मुलांनी नोकरी सोडून सुरू केलं भंगारचं दुकान

लॉकडाऊनचा फटका बसलेल्या गरजूंना या दोघांनी रोजगार मिळवून दिला आहे..हाच आहे आत्मनिर्भर भारत..

  • Share this:

लखनऊ, 28 जुलै : लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारतचा नारा दिला होता. लॉकडाऊनमध्ये अनेकांनी मोदींच्या घोषणेचे पालन करीत स्वयं रोजगार सुरू केला होता. त्यातच आता लखनऊमधील 2 इंजिनीअर मुलांची भर पडली आहे.

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे राहणाऱे 2 इंजिनीअर मुलांनी लॉकडाऊनमध्ये नोकरी सोडून आत्मनिर्भर भारताला वाढविण्यासाठी एक भंगारचं दुकान सुरू केलं आहे. याशिवाय त्यांनी एक पोर्टलही सुरू केलं आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेलेल्यांनाही त्यांनी रोजगार मिळवून दिला आहे.

यातील ओमप्रकाश नावाच्या मुलाने सांगिंतलं की – मी 6 वर्षांपासून सिव्हिल इंजिनीअरची नोकरी करीत होतो. एकेदिवशी आम्हाला काही भंगाराचं सामान विकायचं होतं. परंतू त्यासाठी आम्हाला खूप त्रास सहन करावा लागत होता. तेव्हा आम्ही विचार केला की असं काही काम करायला हवं. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये आम्ही नोकरी सोडली आणि हे काम सुरू केलं.

Published by: Meenal Gangurde
First published: July 28, 2020, 11:12 PM IST

ताज्या बातम्या