शेतकऱ्यांच्या 'मन की बात' ऐका; बळीराजाच्या लेकींची बापासाठी पंतप्रधानांना आर्त हाक

शेतकऱ्यांच्या 'मन की बात' ऐका; बळीराजाच्या लेकींची बापासाठी पंतप्रधानांना आर्त हाक

शेतकऱ्यांच्या लेकींनी पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी तरळेल

  • Share this:

फतेहाबाद, 21 डिसेंबर : आज शेतकरी आंदोलनाचा (Farmer Protest ) 26 वा दिवस आहे. एकीकडे दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने घेराव घालत आहेत आणि निदर्शने करीत आहेत, तर त्यांच्या मागे पत्नी आणि मुलांनी शेताची जबाबदारी स्वीकारली आहे. सतत वाढत चाललेली थंडी व मोकळ्या आकाशाखाली बसून आंदोलन करणाऱ्या आपल्या कुटुंबाबाबत घरातील मुलींना चिंता वाटू लागली आहे. मुलींनी आपल्या प्रियजनांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांच्या मनातील गोष्ट ऐका आणि हक्क देण्यास सांगितलं आहे.

पत्राद्वारे शेतकर्‍यांच्या मुलींनी म्हटलं आहे की, पंतप्रधान महोदय, तुम्ही नेहमी तुमच्या मनातलं बोलता, आता शेतकऱ्यांच्या मनातील ऐका. आज शेतकरी तुमच्याकडून काही मागत आहे. या मुलींनी पत्रात पुढे लिहिलं आहे की, त्यांचे कुटुंबीय खुल्या आकाशाखाली संघर्ष करीत आहेत, परंतु सरकार त्यांचे ऐकत नाही.

या चळवळीत बर्‍याच जणांनी आपल्या कुटुंबातील सदस्य गमावले

पत्रात मुलींनी असं लिहिलं आहे की, या चळवळीमुळे अनेक मुले अनाथ झाली. मुलींच्या डोक्यावरुन वडिलांचा हात हरपला, मात्र तरीही तुम्हाला आमच्या दु:खाची जाणीव झाली नाही. मुली पुढे म्हणतात की, कदाचित तुम्ही शेतकर्‍यांचे दु:ख समजून घेऊ शकत नाही. शेतकरी कडाक्याचा उन्हाळा, कडाक्याच्या थंडीत शेतात पिंकाची काळजी घेतात. तेव्हा कुठे तुम्हाला अन्न उपलब्ध होतं.

शेतकऱ्यांना का त्रास दिला जात आहे?

मुलींनी पुढे लिहिलं आहे की, शेतकरी विरोधी कायदे तयार करुन त्यांना त्रास दिला जात आहे. शेतकऱ्यांना त्यांचे हक्क द्या. अन्यथा पुस्तकं पकडणारे हात बॉर्डरवर येऊन आपलं हक्क मागतील. मग मात्र तुमच्यासाठी अडचणीच होईल आणि एका मुलीला तिचा हक्क द्यावाच लागेल.

 

Published by: Meenal Gangurde
First published: December 21, 2020, 3:08 PM IST

ताज्या बातम्या