मराठी बातम्या /बातम्या /देश /

जंगलात पर्यटकांच्या डोळ्यासमोर रंगला सिंहांच्या शिकारीचा खेळ, पाहा थरारक VIDEO

जंगलात पर्यटकांच्या डोळ्यासमोर रंगला सिंहांच्या शिकारीचा खेळ, पाहा थरारक VIDEO

सिंहाची चालण्याची ढब, ताकद आणि शिकारीचा अनोखा अंदाज यामुळेच त्याला जंगलाचा राजा  असं म्हटलं जातं. सिंह आणि सिंहिणीच्या शिकारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar
नवी दिल्ली 17 जुलै: जंगलाचा राजा म्हणजे सिंह, सिंह आणि सिंहिण शिकारीला निघाल्यावर कुणाचीही पुढे जाण्याची हिंम्मत नसते. एवढा धाक त्यांचा जंगलात असतो असं मानलं जातं. सिंहाची चालण्याची ढब, ताकद आणि शिकारीचा अनोखा अंदाज यामुळेच त्याला जंगलाचा राजा  असं म्हटलं जातं. सिंह आणि सिंहिणीच्या शिकारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सावज टिपण्यासाठी सावध बसलेल्या एका सिंहिणाला मागे टाकत सिंह धावणारं सावज टिपतो आणि बाजी मारतो असा त व्हिडीओ असून IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. जंगलात पर्यटकांच्या अंदाजे 10 गाड्या थांबलेल्या आहेत. सगळे पर्यटक तो थरार बघत असतात. जंगली गुरांचा एक कळप धावत असतो. त्यांना धोक्याचा अंदाज आल्याने ते धावत असतात. कारण बाजूलाच एक सिंहिण शिकारीसाठी बसलेली असते. सावज टप्प्यात येण्याची ती वाट पाहते. मात्र तेवढ्यात मागून चपळतेने सिंह झेप घेतो आणि एका गुराला आपल्या जबढ्यात घेतो. आपला वेळ गेला आणि सावजही गेलं अशा रागात सिंहिण तिथून रागने परत फिरते असं त्या व्हिडिओतलं दृश्य आहे. दहाही गाड्यांवर असलेले सर्व पर्यटक हा थरार बघत असतात. सुशांत नंदा यांनी या व्हिडीओला व्यवहारीक कॅप्शन दिली आहे. नवरा आणि बायको यांच्यातला शॉपिंगचा फरक असं त्यांनी त्यावर लिहिलं आहे. त्यावरून लोकांनी खूप कॉमेंट्स केल्या आहेत.
First published:

पुढील बातम्या