टेकऑफच्या 13 मिनिटांनंतर विमान कोसळलं, 188 लोकांच्या मृत्यूची भीती

टेकऑफच्या 13 मिनिटांनंतर विमान कोसळलं, 188 लोकांच्या मृत्यूची भीती

इंडोनेशियाच्या प्रवासी विमानाला मोठा अपघात झाला आहे. जकार्ताहून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमान समुद्रात कोसळलं आहे. एयर ट्रॅफिक कंट्रोल रुमशी या विमानाचा संपर्क तुटला आहे. या विमानात एकूण 189 प्रवाशी जकार्ताहून पिनांगला जाणार होते.

  • Share this:

इंडोनेशिया, 29 ऑक्टोबर : इंडोनेशियाच्या प्रवासी विमानाला मोठा अपघात झाला आहे. जकार्ताहून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमान समुद्रात कोसळलं आहे. एयर ट्रॅफिक कंट्रोल रुमशी या विमानाचा संपर्क तुटला आहे. या विमानात एकूण 189 प्रवाशी जकार्ताहून पिनांगला जाणार होते.

विमानाने उड्डाण करताच काही मिनिटांनी हे विमान कोसळलं आहे अशी माहिती इंडोनेशिया शोध पथकाने दिली आहे. लायन एअरचं JT 610 हे विमान आहे. राजधानी जकार्ताहून उड्डाण विमानाने उड्डाण केलं होतं. लायन एअरचा प्रवक्ता युसुफ लतीफ याने टेक्स मेसेज करून या अपघाताची माहिती दिली आहे.

बिझनेस पार्टनरची हत्या करून केले 25 तुकडे, पत्नीचाही असा काढला काटा

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेक ऑफ केल्याच्या 13 मिनिटांनंतर विमानाचा राडारशी संपर्क तुटला. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या सांगण्यानुसार अपघात झालेल्या विमानाचं मॉडल  बोइंग 737 MAX 8 असं होतं.

अपघाताची माहिती मिळताच आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं आहे. या अपघातात अद्याप कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

 

VIDEO : भाजप नेत्याने लगावले बार डान्सरसोबत ठुमके, उधळल्या नोटा!

First published: October 29, 2018, 9:04 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading