पक्षाकडे पैसे नाहीत, चहा आणि नाष्ट्याचा खर्च कमी करा!

पक्षाकडे पैसे नाहीत, चहा आणि नाष्ट्याचा खर्च कमी करा!

गेल्या पाचपेक्षा अधिक काळ केंद्रातील सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसला आर्थिक संकटांना तोड द्यावे लागत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर: देशात सध्या मंदीचे वातावरण असल्याची चर्चा आहे. या मंदीचा फटका काही राजकीय पक्षांना देखील बसत आहे. देशातील सर्वात मोठा पक्ष असलेला आणि सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेस पक्षाला देखील मंदीचा मोठा दणका बसल्याचे दिसत आहे. काँग्रेस पक्षाला सध्या आर्थिक अडचणींना तोड द्यावे लागत आहे. पैसे नसल्यामुळे काँग्रेसने सर्व महासिचव, प्रदेशाध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांना खर्चावर लगाम घालण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या पाचपेक्षा अधिक काळ केंद्रातील सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसला आर्थिक संकटांना तोड द्यावे लागत आहे. काँग्रेस पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाने सर्व महसचिव, राज्यातील प्रभारी आणि अन्य पदाधिकाऱ्यांना खर्च कमी करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात शुक्रवारी पक्षाच्या अकाऊंट विभागाने अशी सूचनाच दिली आहे. अर्थात हा खर्च कमी करायचा म्हणजे मोठे खर्च कमी करावेत असे नाही तर चक्क चहा आणि नाष्टावर होणारा खर्च देखील कमी करण्यास सांगितले आहे. चहा आणि नाष्ट्यासाठीचा महिन्याचा खर्च 30 हजार इतकाच ठेवण्यास सांगितले आहे. जर यापेक्षा अधिक खर्च झाला तर ते संबंधित व्यक्तीला द्यावे लागतील.

पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ऑल इंडिया काँग्रेस समितीच्या कॅन्टिनकडून चहा आणि नाष्टा दिला जातो. पदाधिकारी त्या बिलावर स्वाक्षरी करून देता आणि ते बिल अकाऊंट विभागाकडून दिले जाते. याबरोबरच पक्षातील नेत्यांनी कमी अंतराचा प्रवास रेल्वेने करावा असे सांगण्यात आले आहे. दौऱ्यासाठी रात्री थांबण्याची गरज नसेल तर हॉटेल बुक करू नये असे देखील पक्षाने म्हटले आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने दिलेल्या अहवालानुसार काँग्रेस पक्षाला 55.36 कोटी इतका निधी मिळाला आहे. पक्षाच्या संपत्तीत 2017-18 या वर्षात 18 टक्क्यांची घट झाली आहे. 2017मध्ये काँग्रेसची संपत्ती 854 कोटी इतकी होती, त्यात घट होत 2018मध्ये संपत्ती 754 कोटी इतकी झाली आहे.

पंतप्रधान मोदींनी 30 मिनिटं केली समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता, पाहा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: October 12, 2019, 10:42 AM IST
Tags: Congress

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading